महागाव तालुक्यातील वाकद येथील प्रल्हाद खंदारे हे शिक्षकी पेशात शिक्षण विभाग शिक्षण विस्तार अधिकारी होऊन सेवानिवृत झाले . त्यांनी मुलांना उच्च शिक्षण देऊन मोठा मुलगा विक्रांत खंदारे जिल्हा न्यायाधिश व सुन ही न्यायाधिश आहे. मुलगी मोहीनी हिने आय.एस.अधिकारी पदाला गवसनी घालती. नुकतीच देशात पार पडलेल्या युपीएससीच्या परीक्षेच्या निकालात ८४४ वा रँक मिळवून यशस्वी झाली .मुलीच्या उत्तुंग यशाचा अभिमान आणि आनंद वडिलांना गगनात मावेनासा झाला त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळाले. वडिलांनी मुलीच्या स्वागताचे बॅनर लावले. इष्ट मित्रांना पेढ्या चे वाटप केले रविवारी सकाळीच प्रल्हाद खंदारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे महागांव, पुसद, उमरखेड तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे. प्रल्हाद खंदारे यांनी घडविलेले विद्यार्थी त्यांच्या व परिचितामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments