
एक 17 सीटर ट्रॅव्हल्स 15 प्रवाशांना घेवुन कर्नाटक राज्यात जात होती. अचानकपणे उमरखेड तालुक्यातील चिल्ली घाटात आज दुपारी अडीच वाजता दरम्यान ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने एकच तारांबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखून ट्रॅव्हल्स चालकांनी सर्व प्रवाशांना माहिती देऊन खाली उतरवले. रस्त्याच्या कडेला जाऊन उभे राहिल्याने या थरारक ' द बर्निंग ट्रॅव्हल्स ' मधून पंधरा प्रवासी सुखरूप बचावले आहे. मात्र जोपर्यंत अग्निशामक दल उमरखेडला पाचरण करण्यात आले होते. तोपर्यंत ट्रॅव्हल्स जळुन खाक झाली होती.
0 Comments