ब्रेकींग : वडीलांच्या मारहाणीचा मनात राग ठेवून केली हत्या : दुध व्यावसायीकाच्या हत्याकांडाचा उलगडा; आरोपी जेरबंद


यवतमाळ : म्हशी चारण्यासाठी गेलेल्या दुध व्यावसायीकाची हत्या केल्याची घटना काल मिटणापुर परिसरात घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरवित आरोपीला अटक करुन या हत्याकांडाचा उलगडा करण्यात  आला. पुर्वी झालेल्या वादावरून व वडीलास केलेल्या मारहानीचा मनात राग ठेवून धारदार विळयाने व काठीने वार करून दुध व्यावसायीकाला जिवानीशी ठार केल्याची कबुली आरोपीने दिली.

युनूस मुल्ला रा. मिटणापूर असे आरोपीचे नाव आहे. दि. १५ एप्रिल रोजी फिर्यादी सैयद मनसब सैयद रउफ रा. शिवाजी चौक बाभुळगांव यांने पोलीस स्टेशन बाभूळगांव येथे जाबानी रिपोर्ट दिला. दि. १४ एप्रिल २०२५ रोजी त्याचा लहान भाउ सैयद नाजीम सैयद रउफ वय ४० वर्षे रा. मिटणापुर हा मिटणापुर शिवारातील बेबंळा धरणाचे कॅनाल कडे दुपारी ०३/०० वा दरम्यान म्हशी चारण्यास गेला होता. सांयकाळी ५ वाजताच्या सुमारास तो कॅनाल जवळ जखमी अवस्थेत पडून असल्या बाबत माहिती मिळाली. त्यास प्रथम शासकीय रूग्णालय बाभुळगांव येथे उपचार करून रेफर केल्याने यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान रात्री १०/०० वा. सैयद नाजीम सैयद रउफ हा मरण पावला. फिर्यादीचा मृतक भाउ सैयद नाजीम यांस कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी कोणत्यातरी हत्याराने छातीवर, बगलीखाली व डोक्यावर वार करून जिवानीशी ठारकेले अशा फिर्यादीचे रिपोटवरून बाभुळगांव पो. स्टे. येथे अप. क्र ०२४६/२५ कलम १०३ (१) भारतीय न्यासहीता प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांवातील गोपनिय माहिती संकलीत केली. यामध्ये एक ते दिडवर्षापूर्वी मृतक त्याचे शेजारी जाबीर मुल्ला यांचे म्हशीला काठी मारण्यावरून वाद झाला होता.  मृतक यांने जाबीर मुल्ला यास थापड बुक्याने मारहान केली होती. तेव्हा पासुन त्याचे आपसात पटत नव्हेते व बोलचाल बंद होती अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून यवतमाळ उपविभागीय पोलीस अधीकारी दिनेश बैसाने व एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांचे मार्गदर्शनात मृतकचे शेजारी जाबीर मुल्ला यांचा मुलगा नामे युनूस मुल्ला यांस ताब्यात घेतले. बाभूळगांव पो. स्टे. येथे आणून सखोल विचारपूस केली असता,  दि. १४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३/३० वा. मृतक सैयद नाजीम हा त्याचे म्हशी शेताचे जवळील कॅनालवर चारत असताना दिसला. त्याचे सोबत पुर्वी झालेल्या वादावरून व मृतक यांने वडीलास केलेल्या मारहानीचा मणात राग ठेवून त्याचे जवळील धारदार लोखंडी विळयाने व काठीने मृतकचे छातीवर, बगलेखाली व डोक्यावर वार करून जिवानीशी ठार केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून अज्ञात आरोपी विरूध्द दाखल खुनाचा गुन्हा १२ तासाचे आत उघडकीस आणला. आरोपीस पुढील तपसासाठी बाभुळगांव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधीकारी दिनेश बैसाने, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे व लहुजी तावरे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि गजानन राजमल्लू, पालीस अंमलदार सफौ सै. साजिद, सफौ बंडू डांगे, पोहवा रूपेश पाली, पोहवा योगेश डगवार, पोशि आकाश सुर्यवंशी, पोशि देवेंद्र होले, चापोहवा योगेश टेकाम यांनी केली.

Post a Comment

0 Comments