यवतमाळ : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव येथील प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदाना बद्दल प्रतिष्ठित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. 'जीवन गौरव पुरस्कार' हे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या, त्यांच्या संबंधित क्षेत्रात उत्कृष्टता आणि आजीवन समर्पण दाखवणाऱ्या काही ठराविक व्यक्तींना दिला जाणारा अतिशय मानाचा पुरस्कार आहे. .तसेच समाजशास्स्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. श्रीराम खाडे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 'समाजभूषण पुरस्कार' हे शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी दिला जातो. सदर पुरस्कार रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मधुरम सभागृह, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर तर्फे प्रतिष्ठित व्यक्तींसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
प्राचार्य डॉ. अविनाश घरडे आणि प्राध्यापक डॉ. श्रीराम खाडे गेल्या ३५ वर्षांपासून साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी, समर्पण आणि अमूल्य योगदानाचा समाजावर, महाविद्यालयीन विध्यार्थ्यांवर आणि तरुणांवर लक्षणीय परिणाम झाला आहे.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नानाजी खंडाळकर, सचिव मा. ॲड. सुधीर दामले, सहसचिव मा. ॲड. भास्करराव धवस, मा. श्री. नरेंद्र पाटील ठाकरे, व्यवस्थापक मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्यगण, प्राध्यापक आणि कर्मचारी बंधूंनी प्राचार्य डॉ. अविनाश घरडे आणि प्राध्यापक डॉ. श्रीराम खाडे यांच्या योगदानाचा गौरव, कौतुक आणि अभिनंदन केले.
0 Comments