हॉटेलमध्ये चालतो आयपीएल क्रिकेट सट्टा : आरोपीस अटक : एलसीबीच्या पथकाची धाड



यवतमाळ : सध्या आयपीएल क्रिकेटचे सिजन १८ सुरु आहे. त्यावर सट्टा जुगार खेळविण्यात येतो. काल गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर बेंगलोर या क्रिकेट मॅचवर सुरु होती. शहरातील एका हॉटेलमध्ये क्रिकेट मॅचवर सुरु असलेल्या सट्टावर धाड टाकली. एका आरेपीला अटक केली असून, साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

महेश अजाबराव श्रीरंग रा. घाटंजी ह. मु. नागपूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आय. पी. एल. सिजन-१८ क्रिकेट मॅचवर या अवैध बेटींगवर कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले होते. दरम्यान २४ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर बेंगलोर या क्रिकेट मॅचवर हॉटेल ग्रीन गॅन्सन यवतमाळ येथे महेश श्रीरंग नावाचा ईसम क्रिकेट बेटींग सट्टा खेळत असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन दि. २४ एप्रिल रोजी रात्री ९.०० वाजताचे सुमारास हॉटेल ग्रीन गॅन्सन, यवतमाळ येथील रुम नं. २०९ मध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या क्रिकेट मॅच बेटींगवर छापा टाकला. यावेळी महेश अजाबराव श्रीरंग रा. घाटंजी ह.मु. नागपूर हा सदर रुमध्ये मोबाईल मधील रेड्डी अण्णा (लोटस), रॉकीज बुक या अॅपवर क्रिकेट मॅचवर बेटींग सट्टा खेळतांना मिळून आला. त्याचे ताब्यातून ऑनलाईन बेटींग सट्टाकरीता वापरण्यात आलेले साहित्य १ लॅपटॉप, २ मोबाईल जप्त करण्यात आले.
ॲपवरुन ऑनलाईन खेळतात सट्टा

आरोपी महेश श्रीरंग याने त्याचे मोबाईलमध्ये ऑनलाईन क्रिकेट बेटींग सट्टा खेळण्याकरिता रेड्डी अण्णा (लोटस), रॉकीज बुक, ऑल पॅनल या अॅपचा उपयोग केला आहे. त्याने यापूर्वी सुध्दा वरील अॅपवर क्रिकेट सट्टा / बेटींगव्दारे पैशाची मोठ्या प्रमाणात ट्रान्सझेक्शन केल्याचे दिसून आले आहे. त्यावरुन पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर अॅप डेव्हलपर होल्डर आणि क्रिकेट बुकींज यांचा शोध घेण्याकरिता पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ करीत आहे.

जप्त करण्यात आलेले साहित्य

बेटींगच्या नोंदीकरिता वापरण्यात आलेले लॅपटॉप ५०,०००/-, कॉलीग करिता वापरण्यात आलेले मोबाईल ,०००/-, ऑनलाईन बेटींग अॅप असलेला मोबाईल -१०,०००/-, क्रिकेट बेटींगच्या कच्या नोंदी असलेले लेटरपॅड पेपर असा एकूण ६२,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त कण्यात आला.

कारवाई करणारे पथक

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मनवर, सफौ योगेश गटलेवार, पोहवा अजय डोळे, पोहवा विनोद राठोड, पोहवा प्रशांत हेडाऊ, पोहवा निलेश राठोड, पोहवा रितुराज मेडवे, पोशि आकाश सहारे यांनी केली.

 

Post a Comment

0 Comments