यवतमाळ : अमडापूर लघु पाठबधारे विभागाचा अर्धवट असलेला कालवा क्रमांक ७ च्या मोजणी साठी आज लघु पाठबंधारे व महसुल प्रशासनाचे अधिकारी फुलसावंगी शिवारात गेले होते. यावेळी कालव्याला काही शेतकऱ्यांनी विरोध केला. अशातच एका शेतकऱ्यांने विष प्राशन केले. ही घटना आज बुधवारी दुपारी घडली.
शाहरुख खान आलम खान असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. अमडापूर लघु पाठबधारे चा अर्धवट असलेला कालवा क्रमांक ७ च्या मोजणी साठी आज 23 एप्रिल रोजी दुपारी लघु पाठबंधारेचे उपविभागीय अधिकारी कोल्हे, पोलीस स्वरक्षणा सह धडकले. यावेळी येथे कालव्या ला विरोध असलेले शेतकरी सुद्धा आपल्या कुटूंबासह या ठिकाणी हजर झाले. यावेळी शेतकरी व लघु पाठबधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा वाद विकोपाला गेला. त्यामुळे उमरखेडचे उपविभागीय अधिकारी, दंगल नियंत्रण पथक व महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे दाखल झाले. प्रशासन शेती मोजणी साठी सक्ती करत असतांना महिला शेतकऱ्यांनी आधी शेतामध्ये ठिय्या दिला. दरा शाहरुख खान आलम खान या शेतकऱ्याने विष प्राशन केले. सदर शेतकऱ्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी व नंतर सवना येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. वृत्त लिहे पर्यंत प्रकृती स्थिर असल्याचे समजते. यावेळी जी एम राठोड, मंडळ अधिकारी पंडित कर, तलाठी मुख्तार शेख, कोतवाल व इतर कर्मचारी उपस्थित होते.कायदेशीर कारवाई करू
शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांन वर कारदेशीर कारवाही करू अशी प्रतिक्रीया सखाराम मुळे, उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी दिली.
0 Comments