यवतमाळ
: पुसद शहरात एका गुटखा तस्कराच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. त्या ठिकाणावरुन १
लाख ९१ हजाराचा गुटचा जप्त करण्यात आला. ही कारवाई पुसद उपविभागीय पोलीस
अधिका-यांच्या पथकाने केली.
हकीमोद्दीन करीमोद्दीन,
वय ३६ वर्षे, सैय्यद मुक्तार
सैय्यद रशीद, वय २७ वर्षे, दोन्ही रा. नगर परीषद शाळा क्रमांक ०३ जवळ वसंतनगर, पुसद अशी गुन्हा दाखल झालेल्या गुटखा साठविणा-यांची नावे आहे. दिनांक २४ एप्रिल रोजी पोलीस स्टेशन- वसंतनगर, पुसद हद्दीमध्ये नगर परीषद शाळा क्रमांक ०३ जवळ, वसंतनगर येथे हकीमोद्दीन करीमोद्दीन यांचे घरी अवैद्य गुटख्याचा माल असल्याची
गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिस पथकाला घटनास्थळी
धाड टाकली. आरोपी हकीमोद्दीन करीमोद्दीन, वय ३६ वर्षे, सैय्यद मुक्तार
सैय्यद रशीद, वय २७ वर्षे, दोन्ही रा. नगर परीषद शाळा क्रमांक ०३ जवळ वसंतनगर, पुसद हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्यास अपायकारक
असलेला गुटखा अवैद्यरित्या बाळगतांना मिळून आले. सदर गुटख्याची किंमत. १,९१,४९६/- रूपयाचा
असलेला घटनास्थळी जप्त केला. ही कारवाई कुमार चिंता, पोलीस अधीक्षक
यांचे मार्गदर्शनानुसार पोहवा अभिजीत सांगळे, नरेश नरवाडे, पराग गिरनाळे, सौरभ लोखंडे, राहुल मडावी, सोनाली शेळके या अंमलदारांनी केली आहे.
0 Comments