प्रियकरानेच केली प्रेयसीची हत्या : पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या

यवतमाळ : एमएसीबी कार्यालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. सदर महिलेच्या नाकातून रक्त वाहत असल्याने हा घातपात असल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसांनी तपासचक्र फिरविले. यामध्ये प्रियकरानेच लाथीने तोंड दाबुन प्रेयसी महिलेची हत्या केल्याचे समोर आले. घाटंजी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

अजय दादाराव नेवारे वय 30 वर्ष जात गवारी रा. कोंडजई ता घाटंजी असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. तर प्रिती सचिन डाखरे वय 28 वर्ष, रा. खापरी असे मृतक महिलेचे नाव आहे. सदर महिलेच्या पतीचे 9 वर्षोंपुर्वी मृत्यू झाला. महिलेला अंश सचिन डाखरे हा मुलगा आहे.  ते दोघे सरला श्रावण मडावी वय 65 वर्ष रा. ईस्तारी नगर खापरी यांचे घरी भांड्याने राहत होते. तसेच सदर महिला MECB कार्यालय मध्ये ठेकेदारी पध्तीने कामावर होती. ती 6 महीन्यापासुन घरीच होती. आज दिनांक 21/4/2025 रोजी सकाळी 9/00 वाजताचे सुमारास सदर महिलेचा घरातच मृतदेह आढळून आला.  घरमालकीन सरला श्रावण मडावी वय 65 वर्ष रा. ईस्तारीनगर खापरी यांनी मृतक महिलेचे वडील हनुमान गोविंदराव बदकी वय 58 रा.  वासरी यांना फोनकरुन माहीती दिली. त्यावरून मृतक महिलेचे वडील, बहिणी व जावयांनी घटनास्थळ गाठले.  यावेळी मुलगी घरामध्ये गादीवर झोपलेल्या अवस्थेत मरण पावलेली दिसली. मृतक मुलगी प्रिती संचिन डाखरे वय 28 वर्ष हिने काल दिनांक 20/4/2025 रोजी सकाळी 9/00 ते 9/30 वा. सुमारास माझी तब्बयेत ठिक नसल्याने मी लग्नाला येवु शकत नाही असे सागितले होते. त्यानंतर दुस-या दिवशी २१ एप्रिल रोजी सकाळी तीचा मृतदेह आढळला. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला होता. परंतु महिलेच्या घातपात झाल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी तपास करुन या प्रकरणाचा छडा लावला. मृतक प्रिती व अजय नेवारे यांचे अनेक दिवसापासून अनैतिक सबंध होते. गेल्या काही दिवसापासून प्रिती ही लग्न करण्यासाठी आरोपीकडे तगादा लावत होती. या तगाद्याला तो कंटाळून गेला होता. दरम्यान २० एप्रिल रोजी आरोपी अजय नेवारे याने प्रिती राहत असलेल्या घरी गेला. रात्री ती गादीवर झोपून असतांना लाथीने तोंड दाबुन ठेवल्याने प्रितीचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात घडत झाले. या प्रकरणी हनुमाण गोविंदराव बदकी वय 58 वर्षे रा. वासरी याच्या तक्रारीवरुन दिग्रस पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर करीत आहे.

 

Post a Comment

0 Comments