काय बोलले कृषीमंत्री : शेत-याबद्दल काय म्हणाले : कृषीमंत्र्यांचा तीव्र निषेध! , आंदोलन करण्याचा इशारा

यवतमाळ : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रक्षेत्र भेटीदरम्यान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना "शेतकरी कर्जमाफीच्या पैशाने लग्न, साखरपुडे करतात" असे वक्तव्य केले. कृषीमंत्र्यांचे हे विधान अत्यंत असंवेदनशील असून, महाराष्ट्रातील मेहनती शेतकऱ्यांचा अवमान करणारे आहे.  या वक्तव्याचा शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रा. पंढरी पाठे आणि कॉम्रेड सचिन मनवर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 

“शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हवामानातील अनिश्चितता, बाजारातील अस्थिरता, वाढती महागाई अशा अनेक अडचणींशी सामना करत तो आपल्या घामाच्या किमतीवर देश चालवतो. अशा स्थितीत कृषीमंत्र्यांनीच शेतकऱ्यांविषयी असे वक्तव्य करणे हे निंदनीय असून, ते शेतकरीविरोधी मानसिकतेचे प्रतीक आहे.” शेतकऱ्यांविषयी असलेली ही अवहेलना थांबवावी. मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशीही मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.अन्यथा यवतमाळ मध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments