कर्जबाजारीपणाला कंटाळुन शेतक-याची आत्महत्या

घाटंजी : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-याने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवार दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास कुंभारी शेतशिवारात उघडकीस आली.

गजानन देविदास टोंगे वय 32 वर्ष रा. तीवसाला ता. घाटंजी असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा शेती करीत होता. परंतु लोकांचे कर्ज असल्याने त्याने शेती विकली होती. त्याचेवर भारतीय स्टेट बँकचे घरावर व इतर खाजगी लोकांचे कर्ज होते. त्यामुळे तो नेहमी कर्ज कसे फेडायचे या विचारात राहत होता. दिनांक 22 एप्रिल रोजी तो कुंभारी येथे मामाच्या घरी गेला होता. त्यानंतर सायंकाळी 7: 30 वाजताच्या सुमारास तो बाहेर गेला होता. मात्र घरी परत आला नाही. त्यामुळे त्याचा नातेवाईक व इतर लोकांकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. दरम्यान दिनांक 24 एप्रिल रोजी  10/00 वाजता दरम्यान कुंभारी येथील विहिरीत मृतदेह आढळून आला. या प्रकरणाची तक्रार मृतकाचा भाउ सुरज देविदास टोंगे वय 30 वर्ष रा. तिवसाला याने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments