जिल्हाधिकाऱ्यांने काढले आदेश
यवतमाळ : जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून, उष्णतेचा पारा 43 वर पोहोचला आहे. विदर्भात जास्त तापमानाची नोंद यवतमाळची झाली आहे. उन्हाचा विद्यार्थ्यांना तडाखा बसू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने उद्यापासून नर्सरी ते वर्ग सातवी पर्यंतच्या शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात येणार आहे. या संदर्भात आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काढले आहे.
भारतीय हवामान विभाग नागपुरने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार दि १६ एप्रिल रोजी ४३.४ सेल्सीयस, दि १७ एप्रिल रोजी ४३.४ सेल्सीयस, दि १८ एप्रिल रोजी ४३.५ सेल्सीयस, दि १९ एप्रि रोजी ४३.५ सेल्सीयस, दि २० एप्रिल रोजी ४३.६ सेल्सीयस तापमानाची नोंद झाली आहे. मागील ५ दिवसात विदर्भात जास्त तापमानाची नोंद ही यवतमाळ जिल्ह्यात झालेली आहे. त्यामुळे उष्ण तापमानाचा परिणाम प्राथमिक वर्गामध्ये नर्सरी ते वर्ग ७ वी पर्यंत शिकत असलेल्या मुलांच्या आरोग्यवार होऊ नये, याकरीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी उष्णतेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नियोजित असलेल्या परीक्षा वगळता नर्सरी ते वर्ग ७ वी पर्यंत सुरु असलेल्या शासकीय व निमशासकीय शाळा पुढील ८ दिवस सकाळी ७ ते १० वाजता पर्यंत सुरु ठेवण्यात यावे, असे आदेश निर्गमित केले आहे. सदर आदेश सर्व शासकीय व निमशासकीय शाळांना लागू राहील, असे आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
0 Comments