चिकणी डोमगा येथे भिमजयंती महोत्सव : प्रबोधनात्मक कार्यक्रमाची रेलचेल ; पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 ‘लय बळ आला माझ्या दुबळ्या पोरात’ फेम मंजुषा शिंदे यांच्या भीम गीताचा कार्यक्रम ; महादिप परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, शिक्षकासह शासकीय सेवेतील कर्मचा-यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार

यवतमाळ : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९८ व्या व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या संयुक्त जयंती निमित्य नेर तालुक्यातील चिकणी डोमगा येथे भिमजयंती २०२५ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत रमाई एकपात्री प्रयोग, भिम गित, विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भिमजयंतीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मृंद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे.

दिनांक ११ एप्रिल रोजी पहिल्या सत्रात महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रम होणार आहे. सकाळी ८ वाजता पंचशिल झेंड्याचे ध्वजासरोहण करण्यात येईल. सकाळी ८.३० वाजता बुध्द वंदना, सकाळी ९ वाजता महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता रॅली काढण्यात येणार आहे.  दुस-या सत्रात दुपारी १२ वाजता रांगोळी स्पर्धा, दुपारी २ वाजता सामान्य ज्ञान स्पर्धा होणार आहे. तर तिस-या सत्रात सायंकाळी ७ वाजता महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे उद्घाटन मृंद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून पुणे येथील युवा उद्योजक धर्मेश गणविर हे राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन भोयर, प्रमुख अतिथी सरपंच अमोल निंबाळकर, प्रा. सिद्धार्थ कापशिकर, पोलीस पाटील उमेश मेश्राम, नायब तहसीलदार रविंद्र कापशिकर, जि. प. शाळेचे शिक्षक विनोद चव्हाण उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा चिकणी डोमगा येथील महादिप परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर रात्री ८ वाजता सुप्रिया वानखडे ह्या ‘रमाई’ एकपात्री नाटीका सादर करणार आहे.

दिनांक १२ एप्रिल रोजी पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता चित्रकला स्पर्धा, दुस-या सत्रात दुपारी १२ वाजता संगित खुर्ची, दुपारी ३ वाजता महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित प्रश्‍नावलीवर आधारीत पैठणी कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता सांस्कृतीक कार्यक्रम, नायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा (भीमगीत) होणार आहे. तर रात्री ७ वाजता मंजुषा शिंदे यांचा प्रबोधनात्मक भीमगीत गायनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. बाळासाहेब मांगुळकर हे राहणार आहे. प्रमुख अतिथी माजी जि. प. अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी जि. प. सदस्य निखील जैत, मुरलीधर बोरकर, राजकमल कापशिकर, प्रा. सिद्धार्थ मेश्राम, अभियंता संजय डोंगरे, नगरसेवक मनोहर बोरकर, धर्मपाल रामटेके, मनोज घरडे, कैलास गोंडाणे, निरंजन वासनिक उपस्थित राहणार आहे.

दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता विविध स्पर्धा, दुपारी १२ वाजता भोजनदान होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता महादिप परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, शिक्षकासह शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी, उद्योजक, कलाकार, पत्रकारीता व विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, खासदार संजय देशमुख, माजी गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे, दि महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑप. हाउसिंग फायनांस का. मुंबईचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे माजी संचालक बाबुपाटील जैत, माजी नगराध्यक्ष सुनिता जयस्वाल, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल खाडे, केंद्रीय सुरक्षा विभागाचे माजी अधिकारी मुकींदा घरडे उपस्थित राहणार आहे. रात्री ९ वाजता प्रा. रुद्रकुमार व संच यांचा भीमगीत व गझल गायन कार्यक्रम होणार आहे. रात्री १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवा निमित्य केक कापुन आतिषबाजी करण्यात येणार आहे.

१४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ध्वजारोहण व बुद्धवंदना होईल. सकाळी १० वाजता बाईक व कार रॅली काढण्यात येणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष योगेंद्र रामटेके, सुहास मडके, निलकमल बोरकर, देवानंद बोरकर, स्वागताध्यक्ष धर्मेंद्र गणविर, सुशिल घरडे, अमोल वासनिक, अमोल मेश्राम, मनोज मेश्राम, विनोद गोंडाणे, गौतम मेश्राम, प्रणय घरडे, सिद्धार्थ लांजेवार, कामराज गोंडाणे, भगवान कापशिकार, प्रतिक मेश्राम, महेश मेश्राम, सुग्रीव बांबोर्डे, प्रकाश बन्सोड, राहुल लोखंडे, मंगेश बोरकर, स्वप्नील देशभ्रतार, प्रद्युम शेंडे, दिनेश डोंगरे, प्रदिप कापशिकर, विक्की कापशिकर, धनंजय बांबोर्डे, आशिष कापशिकर तथा भीम तरुण उत्साही मंडळ, यशोधरा महिला मंडळ, विशाखा महिला मंडळ चिकणी डोमगा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments