
पोलीस स्टेशन दिग्रस येथे दि. 7 एप्रिल 2025 रोजीला माहिती मिळाली. ग्राम दत्तापूर जवळील कोलोराचे शिवारात एक स्त्री जातीचे प्रेत पडून आहे. अशी माहिती मिळाली होती. त्यावरून पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी एका अनोळखी स्त्री जातीचे प्रेत आढळले. या महिलेचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे. उंची अंदाजे 05 फूट, चेहरा गोल, केस काळे, अंगात निळसर आकाशी रंगाची साडी, निळा ब्लाऊज यावर पांढऱ्या रंगाचे फुलाचे डिझाईन असलेले, दोन्ही हातात निळ्या रंगाच्या बांगड्या, सदर प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले. सद्यस्थितीत नमूद मृत महिलेची ओळख पटलेली नाही. आज दिनांक एप्रिल 2025 रोजीला सकाळी अंदाजे 06.00 वा चे सुमारास 100 मीटर अंतरावर एक पुरुष जातीचे प्रेत पडून आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता एक पुरुष जातीचे प्रेत ( सांगाडा ) मिळून आला. सदर पुरुष जातीचे प्रेताची सुद्धा ओळख पटली नाही. सदर महिलेस किंवा पुरुषास कोणी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन दिग्रस येथे कळवावे असे आवाहन ठाणेदार सेवानंद वानखडे यानी केले आहे.
1 Comments
खूपच छान dir आम्हाला आपल्या जिल्ह्याची चांगली माहिती मिळते👌👍🏻👍🏻
ReplyDelete