गव्हर्नमेंट शाळेतील शिक्षकांकडून अदिबाचा घरी जाऊन सत्कार
यवतमाळ : यवतमाळच्या जि.प.गव्हर्नमेंट शाळेची विद्यार्थीनी अदिबा अनम अश्फाक अहमद हीने युपीएससी परीक्षा पास केली आहे. तिने मिळविलेल्या या यशामुळे गव्हर्नमेंट शाळेचा सन्मान वाढला आहे. दरम्यान आज शाळेच्या सर्व शिक्षकांनी अदिबाच्या घरी जाऊन तिला पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा ( UPSC 2024) अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्राच्या यवतमाळ शहराची रहिवासी तसेच गव्हर्नमेंट शाळेची माजी विद्यार्थीनी अदिबा अनम अश्फाक अहमद हीने संपूर्ण भारतातून 142 वी रँक प्राप्त केली आहे. यापूर्वी आदिबाने यूपीएससी ची मुलाखत दिली होती, परंतु अंतिम निवड झाली नव्हती. पण या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झाली आहे. तिने संपादित केलेल्या रँकमुळे तिला IAS पोस्ट मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे आदिबा अनम ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम IAS बनणार आहे. अदिबाने मिळविलेल्या यशामुळे यवतमाळच्या गव्हर्नमेंट शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. आज शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार, कु. सबाहत तसनिम, तनवीर खान, सुनिल गावंडे, अनवार अहमद मो. निसार, सुनिल बरमेद, कु. शुभांगी शंभरकर, हिमांशु गिराम, श्रीमती शालीनी ठाकरे, सैय्यद असलम अहमद, यासीर आदिल खान, संदिप मारगाये, कु. सैय्यदा फरहीन अंजुम, प्रकाश साबळे, श्रीमती सिमा सिडाम, राजकुमार यादव, प्रविण धाबर्डे, कु. स्मिता मेश्राम, नितीन धोटकर, अमीत अस्वार, पियुष अग्रवाल, नितीन पंधरे, अंर्जुमंद खानम वल्लीउल्हा खान, कु. मुग्धा मेश्राम यांनी अदिबाच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. सर्व शिक्षक घरी आल्यामुळे अदिबाने सुध्दा आनंद व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना मिळेल प्रेरणा
शासनाच्या नगर परिषद अथवा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजात काहीसा नकारात्मक झाला आहे. प्रत्यक्षात निकाल बघितल्यास शासकीय शाळेतूनच अनेक गुणवंत विद्यार्थी घडल्याचे समोर आले आहे.अत्यंत सर्वसाधारण परिस्थितीत जीवन जगणा-या अदिबाने देशातील सर्वात कठीन समजली जाणारी युपीएससीची परिक्षा पास केल्याने ती जिल्हाधिकारी बनणार आहे. ही विद्यार्थीनी जिल्हाधिकारी बनणार ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून तिने जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या यशामुळे अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही. अशी प्रतिक्रीया साहेबराव पवार मुख्याध्यापक, गव्हर्नमेंट शाळा, यवतमाळ यांनी दिली.
0 Comments