बोलणाऱ्या माणसांची व्यवस्थेला भीती असते : जेष्ठ पत्रकार संजय आवटे; परिवर्तनासाठी एक दिलाने एकत्र या


यवतमाळ : संवाद हे आपल्याला एकत्र बांधून ठेवण्याची मोठी कामगिरी करत असते. आपण आपली भूमिका मांडली नाही, बोललो नाही तर आपल्याविरुद्ध काम करणारी व्यवस्था अधिक मजबूत होईल. त्यामुळे व्यवस्था परिवर्तनासाठी एक दिलाने एकत्र या. आपसातील मतभेद विसरून कामाला लागा. बोलणाऱ्या माणसाची व्यवस्थेला भीती असते असे परखड मत प्रसिद्ध पत्रकार संजय आवटे यांनी मांडले. समता मैदान यवतमाळ येथे सुरू असलेल्या समतापर्वाच्या कार्यक्रमात शेवटचे विचार पुष्प गुंफतांना ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आज लोकशाही मूल्यांच्या विरोधात भक्कमपणे वातावरण निर्मिती केलीजात असली तरी आपल्यातील मूल्य भावना, आपल्यातील संघटित शक्ती सर्व अरिष्टाला परास्त करू शकेल याची मला शाश्वती आहे. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला मूल्यांचा स्वीकार करावाच लागेल. आपल्यात दुर्दम्य आशावाद असला पाहिजे सुरेश भट म्हणतात की, हे असे असले तरी हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. त्यामुळे सत्तेसाठी जुमला करणाऱ्या जुमले बाजाना आपण परत सत्तेतून हाकलू शकतो याचा आपण विश्वास बाळगला पाहिजे. जो जय भीम म्हणतो त्याला मत विकता येणार नाही त्याला आपल्या व्यक्तिगत हिताचे राजकारण करता येणार नाही एवढी खबरदारी आपल्याला घेणे आवश्यक आहे. परंपरागत व्यवस्थेचे समर्थन करणारे सत्ताधारी हे केवळ दलित आदिवासी ओबीसींच्या विरोधात नाही तर ते समस्त महिलांच्या देखील विरोधात आहे व्यवस्थेने महिलांचे जेवढे शोषण केले त्यातही ब्राह्मण मही लाचे जेवढे शोषण केले तेवढे शोषण व्यवस्थेने अस्पृश्याचे देखील केले नाही त्यामुळे ज्यांचं ज्यांचं व्यवस्था शोषण करू शकते अशी खात्री ज्यांना आहे त्या सर्वांनी एक दिलाने एकत्र आले पाहिजे आणि एक लक्षात ठेवा गांधी नेहरू आंबेडकर म्हणजे भारत ही संकल्पना आपल्याला मान्यच करावा लागेलअसेही ते म्हणाले. यावेळी अध्यक्ष पदी माधुरी वालके, अतिथि अॅड. सिमा तेलंग, केशव सावलकर, पपीता मालवे, विशाल जाधव, ईत्यादि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्रमोदिनी रामटेके यानी केले.

Post a Comment

0 Comments