ब्रेकींग : आयशरची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार ठार, दोन मुली जखमी


यवतमाळ : भरधाव आयशरने पाठीमागून दुचाकीस धडक दिली. या भिषण अपघातात दुचाकीस्वार इसम घटनास्थळीच ठार झाला असून, दोन मुली जखमी झाल्या. ही घटना आज मंगळवारी दि. ८ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मारेगाव वन गावाजवळून पांढरकवडाकडे जात असतांना घडली.

रामदास जलपत धुर्वे (वय ५० वर्षे) रा. सायखेडा असे मृतकाचे नाव आहे. तर मृतकाची मुलगी तृप्ती रामदास धुर्वे वय २४ मुलगी व पुतणी वैष्णवी विलास पेंदोर (वय २३) रा. कारेगाव पारोंबा ता. झरी अशी जखमींची नावे आहे. रामदास धुर्वे हे सायखेडा येथे राहत असून रोजमजुरीचे काम करत होते. रामदास यांना अक्षय व तृप्ती नावाचे दोन अपत्ये आहेत. त्यांच्याकडे चुलत बहिण वंदना विलास पेंदोर रा. कारेगाव पारोंबा ता. झरी हिची मुलगी वैष्णवी विलास पेंदोर वय २४ वर्षे हिचे लग्न जुळले होते. त्या पावनीन म्हणून ताटवाटीच्या कार्यक्रमाला सायखेडा येथे आपल्या भावाकडे सोमवारी दि.७ एप्रिलला आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मंगळवारी ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास रामदास हा त्याची मुलगी तृप्ती व त्याची पुतणी वैष्णवी असे मोटर सायकल क्र. एम. एच. २९ ए व्ही २०९५  ने वैष्णवीला सोडण्याकरीता सायखेडा वरुन कारेगाव (पारोंबा) ता. झरी येथे जाणे करीता निघाले होते. मारेगाव वन गावाचे जवळुन पांढरकवडा कडे जात असतांना दुचाकीला अज्ञात अयशर वाहनाने पाठीमागुन धडक दिली. या अपघातात रामदास जागीच ठार झाला. तर त्याची मुलगी तृप्ती, पुतनी वैष्णवी ह्या जखमी झाल्या असून,  त्यांना पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना  पुढील उपचाराकरीता यवतमाळ येथील सरकारी दवाखाण्यात पाठवले आहे.या घटनेची फिर्याद मारोती गोदराजी धुर्वे वय ६४ वर्ष यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिली असून, पुढील तपास पोलिस करीत आहे.

Post a Comment

0 Comments