ब्रेकींग न्यूज : शस्त्राने वार करुन दुध व्यावसायीकाची हत्या : यवतमाळ जिल्ह्यात चाललंय तरी काय ?

 

यवतमाळ : जंगलात म्हशी चारण्यासाठी गेलेल्या दुध व्यावसायीकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना बाभुळगाव तालुक्यातील मिटनापूर येथे आज सोमवारी १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजातच्या सुमारास घडली.

सय्यद नाजीम सय्यद रऊफ वय ४० वर्ष रा. मिटनापुर असे मृतकाचे नाव आहे. तो स्वतःहा म्हशी चारुन दुग्ध व्यवसाय करीत होता. त्याचे घराचे मागे जाबिर मुल्ला यांचे घर आहे. दिड ते दोन वर्षापुर्वी मृतकाचे व जाबिर मुल्ला यांचे म्हशीला मारल्याचे कारणावरुन वाद झाला होता. दरम्यान दिनांक १४ एप्रिल रोजी सय्यद नाजीम हा दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घरुन म्हसी घेवुन मिटनापुर शिवारातील बेबंळा धरनाचे कॅनाल कडे चारण्यास घेवुन गेला होता. दरम्यान अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार सय्यद नाजीम यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. सायंकाळी ५ वा. दरम्यान जखमी अवस्थेत ऑटोत टाकुन त्याला बाभुळगाव येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रात्री १० वाजताच्या सुमारास उपचारा दरम्यान सय्यद नाजीम याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची फिर्याद मृतकाचा भाउ सय्यद मनसब सय्यद रऊफ रा. शिवाजी चौक बाभुळगाव  यांनी बाभुळगाव पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन बाभुळगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

जिल्ह्यात चांललय तरी काय ?

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून खुनाचे सत्र सुरुच असून, गेल्या साडे तीन महिन्यात १३ खुनाच्या घटना घडल्या आहे. सतत होत असलेल्या खुनाच्या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला असून, जिल्ह्यात नेमक चांललय तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.

Post a Comment

0 Comments