यवतमाळ : वणी तालुक्यातील नदीच्या काठेवर भुरकी गाव वसलेला आहे. या गावामध्ये बऱ्याच दिवसापासून वाघाने धुमाकूळ घातलेला आहे.
वाघाच्या दहशतिमध्ये गावातील लोक राहत आहे. दिनांक 7
एप्रिल रोजी 4 वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने बकरीवर
हल्ला चढवून शिकार केली.
नानाजी मेश्राम रा. भुरकी हे लोणारे यांच्या शेतात बक-या चरायला घेऊन गेले होते. एका पट्टेदार वाघाने बकरीवर हल्ला करून बकरीला ठार मारले. बकरीवाले च्या आवाजाकडे
तसेंच लोक ओरडण्याचा आवाजाकडे गावातील लोक
धावून गेले असता वाघाला हाकलावून लावले. आजपर्यंत वाघाने 3 बकरे खाल्ले आहे परंतु वनविभागाचे
कर्मचारी या घटनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तरी वनरेसकयू टीम
बोलावून वन कर्मचाऱ्यांनी या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील लोक करीत आहे.
परंतु गेल्या काही महिन्यापासून वाघ या गावा लगत फिरत असून सुद्धा या गावातील लोक वाघाच्या
दहशती मध्ये कसेतरी जीव धोक्यात टाकून शेतात काम करीत आहे. बेजबाबदार वणविभागाच्या
कर्मचाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे नाहीतर कधी कुणाचा जीव जाऊ शकते. तसेच जनावरांवर हल्ला करून मारले त्यांची नुकसान भरपाई
देण्यात यावी, वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी माणी
गावक-यांनी केली आहे.
0 Comments