त्यामुळे लाडकी बहिण योजना जाहिर केली : महायुतीचे सरकार हे सर्वसामान्याचे सरकार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यवतमाळ :  मी एका शेतक-या मुलगा आहे. गरिबी काय असे ते अनुभावली आहे. माझ्या आईला रात्रंदिवस काम करताना पाहिले आहे. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी लाडकी बहिन योजना जाहीर करण्यात आली. रात्रंदिवस काम करणा-या गरीब महिलांना दिलासा देण्यासाठी ‘लाडकी बहिण’ ही योजना आणण्यात आली आहे. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. लाडकी बहिण ही योजना विरोधकांना पचले नाही. त्यांनी या योजनेच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावले असा आरोपही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.

विधानसभा निवडणूकीत जनतेंनी महायुतीला कौल दिल्याने जनेचे आभार मानण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आभार यात्रेचे यवतमाळ येथील समता मैदानात आयाजन केले होते. यावेळी उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुका संपल्यानंतर आपण आपल्या लाडक्या बहिणी, भाऊ आणि ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रवासाला निघालो आहो. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जनतेसाठी काम केले आहे. आता येत्या पाच वर्षासाठी ते आपल्या महायुती सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या मंत्र्यांसह  विकासकामांना प्राधान्य देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच सर्वसामान्यांना चांगले दिवस आणण्यासाठी विकासकामांवर भर दिला जात आहे. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. या योजनेसंदर्भात विरोधकांनी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. मात्र विरोधकांचे तेथे काही चालले नाही  आणि निवडणुकीत  विरोधकांना त्यांची जागा दाखवून देत महायुतीला प्रचंड बहुमताने विजय मिळवून दिला.

महायुती सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून १६ हजार कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. हे घेणारे सरकार नाही तर देणारे सरकार आहे. लाडली बहिण योजना कधीही बंद होणार नाही. काँग्रेस आणि आघाडी सरकारने निवडणूक आश्वासनांची पूर्तता केली नाही. तर महायुतीचे सरकार हे नागरिक आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू ठेवून काम करणारे सरकार आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी पूर्वी मुख्यमंत्री असताना लोक त्यांना मुख्यमंत्री म्हणायचे. त्या काळात ते स्वत:ला मुख्यमंत्री म्हणवून घेत असत. आज जेव्हा ते उपमुख्यमंत्री आहे, ते मी स्वत:ला कॉमन मॅन म्हणवून घेत आहे.

पालकमंत्री संजय राठोड यांच कौतुक

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. राज्यभरात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपये खर्चून कालवे बांधण्याचे काम सुरू आहे. यावेळी त्यांनी यवतमाळमधील एमआयडीसीसाठी जागेचे सर्वेक्षण करण्याबाबतही सांगितले.  या कार्यक्रमाचे संचालन शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील हजारो नागरिक, महिला यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना पदाधिका-यांची उपस्थिती

या कृतज्ञता सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, पराग पिंगळे, श्रीधर मोहोड, महेश पवार, विश्वास नांदेकर, राजुदास जाधव, सलीम खेतानी, डॉ. शीतल वातीले, प्रवीण निमोडिया, हरिहर लिंगनवार आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करा

आगामी स्थानिक निवडणुकांच्या काळातही एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करावेत, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. एकनाथ शिंदे यांनी सर्व जनतेला न्याय देण्याचे काम केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे असे ते म्हणाले.

उबाठा पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी गजानन डोमळे, संजय रंगे, गजानन राऊत, एकनाथ तुमकर, विष्णू राठोड आदि पदाधिका-यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तसेच काँग्रेस, प्रहार व अन्य पक्षाच्या पदाधिका-यांनी शिवसेना शिंदे गटता प्रवेश केला आहे.

पत्रकारांसोबत हुज्जत

जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज यवतमाळ येथे आभार यात्रेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या वृतसंकलनासाठी गेलेले इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी संजय राठोड व विवेक याच्यासोबत वाद करुन धक्काबुक्की केली. या घटनेचा पत्रकार बांधवांनी जाहिर निषेध करुन सदर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments