यवतमाळ : जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून तापमान 43- 44 वर पोहोचले आहे. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहे. दरम्यान यवतमाळ शहरातील शनि मंदिर चौकात आज बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास धावत्या क्रुझर या वाहनाला अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बंद करू बाहेर आले. काही क्षणातच आगीचा भडका झाला. यावेळी वाहतूक पोलीस शिपाई व नागरिकांनी पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. या आगीत वाहन जळून खाक झाले असून मालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments