ब्रेकींग न्युज : तर गाव झाले असते बेचिराख : एका घरासह तीन गोठ्याला भिषण आग : जिवाची बाजी लावून आगीतून काढले गॅस सिलिंडर

यवतमाळ : उन्हाळा लागल्याने शेतातील मशागीतच्या कामाला सुरुवात झाली आहे. गावालगत असलेल्या शेतातील धुरा पेटविल्याने त्याची ठिनगी उडून घराला आग लागली. पाहता पाहता आगीने घरालगत असलेल्या तीन गोठ्याला कवेत घेतले. यावेळी एका इसमाने जिवाची बाजी लावून घरातील गॅस सिलिंडर आगीतून बाहेर काढला. या घटनेत घर जळुन खाक झाले असून, घरातील संपुर्ण साहित्याची राखरांगोळी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. ही घटना आज बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी आर्णी तालुक्यातील तळणी या गावात घडली.

आर्णी तालुक्यातील तळणी या गावाला लागुन असलेल्या एका शेतात धुरा पेटविला होता. या आगीची ठिंनगी उडाल्याने घराला आग लागली. पाहता पाहता आगिने रौद्ररुप धारण करुन एका पोठोपाठ तीन गोठ्याला कवेत घेतले. यामध्ये आग आटोक्यात आणतांना शेषराव आडे यांच्या घरी ठेवून असलेली रोख रक्कम, महत्त्वाचे कागद पत्रे , शेती उपयोगी साहित्त्य, घरातील  किमती वस्तू , दैनंदिन जीवनासाठी आवश्यक साहित्य देखील जळुन खाक झाले. गोठ्यातील शेतीची साहित्य ,कडबा,  खुटार व इतर साहित्य जळून खाक झाले. तसेच एक बकरीचे  पिलू आगीने होरपळले आहे. सर आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या आगीत शेषराव आडे यांचे घर संपुर्ण जळुन खाक झाले असून, नितिन आडे, परसराम राठोड, कसनदास आडे यांचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला आहे.


गावक-यांचे शर्तीचे प्रयत्न

आज बुधवारी सकाळी घराला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग  विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने संपुर्ण घर कवेत घेतले होते. गावातील सर्व नागरिकांनी अतोनात प्रयत्न करत आग  विझविण्यासाठी जिवाजी बाजी लावली.

आगितून काढले सिलिंडर

घरात गॅस असल्याचे घरातील प्रपूल आडे यांनी जिवाजी बाजी लावून गॅस सिलिंडर बाहेर काढला. त्यामुळे त्याला आस लागली केस जाळली. यामुळे पूर्ण गाव पेट घेता घेता वाचले. या आगीमुळे घराला लागून असलेले हिरवागार झाडे जळाले. या आगीने पूर्ण गावात भीतीचे वातावरण झाले होते , हि आग आटोक्यात आली नसती तर पूर्ण तळणी या गावाची राख झाली असती से नागरिकांचे म्हणने आहे.

घाटंजी व आर्णी पालिकेच्या अग्निशमन दलालाने विझविली आग

घाटंजी -आर्णीच्या रोडचे काम सुरु असून ईगल इन्फा इंडिया लिमिटेड उल्हासनगर कंपनीच्या पाण्याच्या ट्रंकरने वेळीच मदत केली त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविले. तसेच घाटंजी आर्णी येथील अग्निशमन दल तळणी येथे घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

आग विझविणारे अग्निशमन दलाचे पथक

आर्णी येथील अग्निशमन दलाचे अनिल देशमुख, दिपक जाधव, विनित नारनवरे सुनील डोकं, घाटंजी येथील अग्निशमन दलाचे संतोष जाधव, आशिष  गिरी, अमोल गोडे सुरेश कुमरे कर्मचारी होते. यावेळी आमदार राजू तोडसम यांनी कुटुंबाची भेट घेतली, स्थानिक प्रशासना मार्फत पीडित कुटुंबांना तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची घोषणा केली. दुपारी मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी सुनील राठोड यांनी पंचनामा करून तहसीलदार आर्णी यांच्या कडे सादर केला. शासनाने मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.  

Post a Comment

0 Comments