यवतमाळ : पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कु-हाडीने सपासप वार केले. ही घटना नेहरूनगर घाटंजी येथे आज रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
काजल प्रफुल टिपले वय 25 रा. असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रफुल गौतम टिपले वय 40 वर्ष, रा. नेहरु नगर घाटंजी असे आरोपीचे नाव आहे. तो पत्नी सोबत कौटूंबिक वादाच्या कारणावरुन वाद करत होता. 21 एप्रिल 2025 रोजी रात्री पत्नी काजल ही झोपेत होती. अशातच प्रफुल टिपले याने रात्री दोन वाजता च्या सुमारास रात्री घरात झोपुन असताना पत्नी काजल हिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. गळ्याच्या उजव्या बाजुला गंभीर जखमी करुन तिला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी महिलेचा भाचा सौरभ पाटील व त्याचा मित्र दुर्गेश कुंभारे यांनी दुचाकीने जखमी असलेल्या काजल टिपले यांना घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. या प्रकरणाची तक्रार दुर्गेष अरुन कुंभारे वय 24 वर्षे रा. खापरी घाटंजी यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनी शशिकांत नागरगोजे करीत आहे.
0 Comments