यवतमाळ : अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते
ती जिद्द कायम ठेवून काम केल्यास यश तुम्हाला प्राप्त होते असे प्रतिपादन अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी केले.
माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जितेश नावडे हे सदैव सामाजिक
कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या माऊली फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या हक्कासाठी
माऊली मंचच्या माध्यमातून व्यासपिठ उपलब्ध करून
दिले आहे. पदग्रहण सोहळा मंगळवारी माऊली सदन' समर्थवाडी, यवतमाळ येथे पार
पडला. यावेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान या
सोहळ्याच्या प्रमुख अतिथी होत्या.
यावेळी तेजश्री प्रधान यांनी सिनेसृष्टीतील विविध गोष्टींचा उलगडा केला. विदर्भातून अशी कुठली ऑफर आली तर ती मी नक्कीच स्विकारले असे सांगितले. जितेश
नावाडे करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी प्रमुख
अतिथी कल्पना मांगूळकर, प्रिया तोडसाम, वर्षा निकम, डॉ. सारिका शाह, मनीषा
आखरे उपस्थित होत्या. यावेळी माऊली फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष सुजाता
जिद्देवार, सचिव मालती नावडे, संचालक नितीशा खासरे,
माऊली मंचच्या अध्यक्षा संपदा महाजन, उपाध्यक्ष प्रणाली कहाते,
सचिव धनश्री चिकटे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संचालन दीपा झिलपे यांनी केले.
0 Comments