ब्रेंकीग : पतीनेच केली पत्नीची हत्या : यवतमाळातील घटना

  1. यवतमाळ : कौटुंबिक कलहातून लोखंडी राॅडने हल्ला करून पतीनेच पत्नीची हत्या केली. ही घटना आज सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी दुपारी शहरातील गाडगे नगर परिसरात घडली.

शालू प्रवीण शास्त्रकार राहणार गाडगे नगर यवतमाळ असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर बाळू उर्फ प्रवीण शास्त्रकार वय 42 वर्ष राहणार गाडगे नगर यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. आज सोमवारी दुपारच्या सुमारास पती प्रवीण व पत्नी शालू या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पती प्रवीणने लोखंडी रॉडने पत्नी शालू वर हल्ला चढविला. त्यात शालू गंभीरित्या जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला.  दरम्यान घटनेनंतर मारेकऱ्याने स्वतः पोलिस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात शेव विच्छेदनासाठी पाठवला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या साडेतीन महिन्यात जिल्ह्यात बारा खूणाच्या घटना घडल्या आहे या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments