गुप्तधन : सोण्याची हंडी काढण्याचे आमिष दाखविणा-या दोन अरोपींना अटक

अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त : वणी पोलिसांची कारवाई

यवतमाळ : आयुवैदीक औषधी देण्यासाठी आलेल्या इसमांनी गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक केल्याची घटना वणी येथे घडली होती. या प्रकरणी वणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवुन दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कृष्णा कन्हैया येधानी, वय २७, रा. कवठा, नागपूर, जितेंद्र जीवन राठोड, वय २९, रा. आसोला सावंगी, नागपूर अशी आरोपींची नावे आहे. वणी येथील विजय महादेव टोंगे रा. अंतरगाव जि. चंद्रपूर यानी १६ मार्च रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी आयुर्वेदीक औषधी देण्याकरीता फिर्यादीचे घरी गेले होते. त्यानंतर फिर्यादीचे घरी सोन्याची हंडी काढुन देतो अशी बतावणी केली. विजय टोंगे याच्याकडून नगदी 1,65,000 रु. व 11 ग्रॅम सोन्याचा नेकलेस कि, 1,00,000 रु. असा एकुण 2,65,000 रुपयांचा ऐवज घेतला होता. त्यावरुन पो. स्टे. वणी येथे अप. क्र. 204/25 कलम 318(4), 352, 351(2) (3) भान्यांस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वणी पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत दोन्ही आरोपींना अटक करुन मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिसांनी दिला मुद्देमाल परत

दि. ९ एप्रिल रोजजी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी, वणी यांनी फिर्यादीला मुद्देमाल परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या हस्ते फिर्यादी विजय टोंगे यांना पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमाल परत करण्यात आला. एकदा चोरीस गोलेला मु‌द्देमाल परत मीळण्याची आशा सोडली होती. परंतु आपला मु‌द्देमाल परत मिळाल्याने फिर्यादी विजय टोंगे यांनी वणी पोलिसांचे आभार मानले.

कारवाई करणारे पथक

सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश कींद्रे, पोलीस निरीक्षक उंबरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश अपसुंदे, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने व वणी पोलिसांनी केली.

Post a Comment

0 Comments