मुलाला दवाखान्यात नेले अन् चोरट्याने घर फोडले: सोन्याच्या दागिन्यासह मुद्देमाल लंपास

महागाव : तालुक्यातील हिवरा येथील डेली चालक आपल्या मुलाची तब्येत ठिक नसल्याने यवतमाळ येथील दवाखान्यात घेवून गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्याने घर फोडून सोन्याच्या दागिन्यासह हजारोचा मुद्देमाल लंपास केला. 

हिवरा येथील अतुल केशवे डेरी चालक यांचा मुलगा आजारी असल्याने दिनांक 05/04/25 रोजी यवतमाळ येथे दवाखान्यात घेऊन गेले. त्यांचा मुक्काम यवतमाळला झाला. दिनांक 06/04/25 रोजी सकाळी 08/00 वाजता घरी परत आले. त्यांना त्यांच्या घराचे दरवाज्याचे कुलूप तोडून दिसले. घरात जाऊन पाहिले असता सर्व सामान अस्थाव्यस्त पडून दिसले. अलमारी पाहिली असता त्यामधील नगदी 4000 रुपये व लहान मुलांची सोन्याची अंगठी 4 ग्रॅम किंमत अंदाजे 36000 रुपये व चांदीचे जोडवे दोन तोळ्याचे 1880 रुपये असा एकूण 41,880 रुपयांचा मुद्देमाल दिसून आला नाही तो कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे अशा जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गजानन ऐडतकर, दिनेश आडे, संतोष जाधव ,कैलास मार्कड हे करत आहे.

Post a Comment

0 Comments