यवतमाळ : दोन महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट
सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे. यामुळे शेंबाळपिंप्री येथे काही काळ तणावाचे वातावरण
निर्माण झाले होते. ही घटना पुसद तालुक्यातील शेंबाळपिंप्री येथे आज १ एप्रिल रोजी
घडली. या घटनेच्या निषेधार्थ शेंबाळपिंप्री कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. पुसद
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, खंडाळा पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळ
गाठले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले
आहे.
शेंबाळपिंप्री येथील एका युवकाने १ एप्रिल रोजी सोशल मीडियावरुन दोन महापुरुषांबदल आक्षेपार्ह
पोस्ट व्हायरल केली. त्यामुळे शेंबाळपिंपरी येथील
पोलीस चौकीवर नारिकांनी धडक दिली. सबंधीत तरुणांवर त्वरित कायदेशीर
कार्यवाही करून अटक करण्याची मागणी केली. गावातील नागरिकांनी मार्केट लाईन व गावंबंद करण्याचे आव्हान केले होते. त्यामुळे संपुर्ण मार्केट लाईन, बस स्थानक परिसरातील व्यावसायीकांनी
आपली प्रतिष्ठाने बंद केले. त्यामुळे गावात तणाव पूर्ण शांतता पाहायला मिळाली. या घटनेची
माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे., खंडाळा पोलीस स्टेशनंचे ठाणेदार देविदास
पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवानंद कायंदे, सुरेश राठोड, गोपाल मोरे, सर्व पोलीस स्टॉफ आणि दंगलग्रस्त पथकाला
पाचारण करण्यात आले. खंडाळा पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले
आहे. सदर गुन्हेगारावर अनुसूचित जाती, जमाती अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला तडीपार करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी
जमावांना शांतता राखण्याचे आव्हान केले. ठाणेदार देविदास पाटील यांच्या भ्रमणध्वनी वरून अप्पर पोलीस
अधीक्षक यांनी दोन्हीं समाजांना अपल्या फिर्यादी पो. स्टे.ला दाखल करा. त्यानंतर संबंधिंतावर
गुन्हे दाखल करून तडीपारीचीं आणि ऍट्रॉसिटी कलमांव्यय गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे
सांगितले होते. त्यावरुन शेंबाळपिंपरी येथील सुमेध संजय मनवर वय 25 वर्ष रा. शेंबाळपिंपरी यांचा जबानी रिपोर्ट देण्यात आला. तर विशाल
सुरेश देशमुख वय 27 वर्ष रा. शेंबाळपिंपरी याची जबानी रिपोर्ट खंडाळा पो. स्टे. मध्ये दाखल करण्यात
आला. पोलीस प्रशासनाकडून कड्डक कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात
आले. त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर समाज बांधव न्यायासाठी रस्त्यावर उतरतील
असा अल्टीमेटल खंडाळा पो.स्टेचे ठाणेदार.पाटील यांना देण्यात आला. यावेळी सर्वश्री
माजी सरपंच लक्ष्मण कांबळे, माजी प. स. उपसभापती
गणेश पागिरे, डॉ.अजित चंदेल, सौपू पाटील, राजू वाहूळे, बापूराव कांबळे, सुनील वाहूळे, समीर देशमुख, राजरत्न मनवर, विजय कांबळे, चेंद्रमनी मनवर, केरबा कांबळे, सुमेध मनवर, विशाल देशमुख, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रकारणी
खंडाळा पो. स्टे मध्ये आ. क्र. 128/25 बीएनएस 299,एस. टी, एसी ऍक्ट 3(1) (V) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील
तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली
खंडाळा पो. स्टे. चे ठाणेदार देविदास पाटील व त्यांचे सहकारी टीम करीत आहे.
0 Comments