महागाव (यवतमाळ) : महागाव तालुक्यातील सवना येथील रहिवासी तथा कट्टर शिवसैनिक चक्रधर गोटे यांचे आज निधन झाले. तब्येत साथ देत नसल्यामुळे ते गेली अनेक वर्षापासून ते संभाजीनगर येथे आपल्या मुलाकडे राहत होते. त्यांचा महागाव तालुक्यात असंख्य चाहता वर्ग आहे. निधनामुळे परिसरात शोककळा पसरली इहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. चार दिवसापूर्वीच त्याने भावाबरोबर बोलताना माझे बरे वाईट झाल्यास सवना येथे अंत्यसंस्कार करावा कारण त्या ठिकाणी माझे बरेच मित्र, हितचिंतक उपस्थित राहतील असे सांगितले होते. अंत्यविधी उद्या 8 एप्रिल रोजी सवना येथे होणार आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments