संविधानाचा सन्मान, जागृतीसाठी रॅली

यवतमाळ :  समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळच्या वतीने "संविधान सन्मान रॅली" चे आयोजन करण्यात आले. ही रॅली समता मैदान येथून सुरू होऊन हनुमान आखाडा, सिटी पोलीस स्टेशन, संविधान चौक, जिल्हा सत्र न्यायालय आणि पुन्हा समता मैदान इथपर्यंत भव्य स्वरूपात पार पडली. रॅलीत विविध पोस्टर, पथनाट्य, आणि दृश्य सादरीकरणांच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.यामध्ये सर्व नर्सिंग कॉलेजेस, सावित्रीबाई फुले समाजकार्य महाविद्यालय, युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. छोट्या चिमुकल्यांच्या लेझीम पथकांनी रॅलीला वेगळाच रंग दिला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माँसाहेब आणि माता रमाई यांच्या भूमिका साकारून समाजप्रबोधनाचं कार्य केलं. या यशस्वी उपक्रमासाठी अॅड सिमा तेलंगे,  रॅलीचे मुख्य संयोजक कॉम्रेड सचिन मनवर, कृष्णा पुसनाके, प्रा. घनश्याम दरणे, प्रा. अंकुश वाकडे, नितेश मेश्राम, हेमंत कांबळे, नारायण थुल, प्रमोदिनी रामटेके, माधुरी वाळके, भाग्यश्री खडसे, शुभम वाळके, स्नेहल रेचे, ज्योती जीवने, प्रा.पंढरी पाठे, विनय मिरासे, आणि समता पर्व प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments