यवतमाळ : जेएनयू विद्यापीठातील फ्रेंच फिलॉसॉफी चे प्राध्यापक व मराठी साहित्यातील बेस्ट सेलर 'भुरा ' आत्मकथनाचे लेखक डॉ शरद बाविस्कर हे १२ एप्रिल ला यवतमाळ येथे असणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दरम्यान समता पर्व कार्यक्रमानिमित्त समता मैदान, राजश्री शाहू महाराज समता परिसर, यवतमाळ येथे डॉ शरद बाविस्कर यांचे *विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बदलत्या भूमिका व युवकांसमोरील प्रश्न* या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. समता पर्व प्रतिष्ठान, यवतमाळ यांचे वतीने दरवर्षी ७ ते १३ एप्रिल दरम्यान कला, साहित्य, सामाजिक व बौद्धिक क्षेत्रातील दिग्गजांना बोलावून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून डॉ शरद बाविस्कर यांचे १२ एप्रिल ला सायंकाळी जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. या प्रसंगी समता पर्व प्रतिष्ठान, यवतमाळ यांच्या वतीने डॉ शरद बाविस्कर यांना समता भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पष्ट व प्रखर वक्ता अशी ख्याती असलेले डॉ शरद बाविस्कर यांनी इंग्लंड, फ्रान्स, इटली लखनऊ व दिल्ली येथून पाच विषयात मास्टर डिग्री घेतली असून शैक्षणिक, सामाजिक व राजकीय विषयांवर संपूर्ण देशात त्यांचे जवळपास दोनशे व्याख्यान झाले आहेत.
The Menu of this blog is loading..........
0 Comments