महायुती सरकारने दिलेल्या कर्जमाफी वचनाचे काय झाले : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का ? ; ९ मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा

यवतमाळ : महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं वचन दिलं होतं. परंतु अजून पर्यंत ते कर्जमाफीचे वचन पूर्ण केलं नाही. महायुती सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे. शेतक-यांना कर्जमाफी मिळणार का असा सवाल उपस्थित होत आहे. शेतक-यांच्या कर्जमाफीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठाच्या वतीने ९ मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती खा. संजय देशमुख यांच्यासह शिवसेना पदाधिका-यांनी दिली.

यवतमाळ येथील विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिनांक 9 मे 2025 शुक्रवार दुपारी 2 वा. वनवासी मारोती देवस्थान पासून ट्रॅक्टर मोर्चाची सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने वनवासी मारुती देवस्थान यवतमाळ पासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे. हा मोर्चा खा. संजय देशमुख, आ. संजय देरकर, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, प. वि. संपर्क संघटीका सागर पुरी, जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात निघणार आहे. या ट्रॅक्टर मोर्चात जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केले आहे.

 

 


Post a Comment

0 Comments