यवतमाळ : बांधकाम क्षेत्रातील समस्या सोडविण्यात अग्रगण्य असलेल्या क्रेडाई या संघटनेची नुकतीच एक सभा संपन्न झाली. या सभेत नव्याने अध्यक्ष आणि सचिव पदाची निवड करण्यात आली. अध्यक्ष पदी अभियंता संजय ठाकरे तर सचिव पदी हर्षद जायले यांची एकमताने निवड झाली. उपाध्यक्ष पदी अभियंता विनायक कशाळकर आणि संजय चिद्दरवार आणि कोशाध्यक्ष पदी अतुल देशपांडे यांची निवड करण्यात आली. ही कार्यकारणी पुढील दोन वर्षासाठी राहणार आहे. आज झालेल्या सभेत गेल्या दोन वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आणि पुढील कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आली.
The Menu of this blog is loading..........
0 Comments