यवतमाळ
: राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक अश्वती दोरजे ह्या सध्या यवतमाळ जिल्हयाच्या वार्षीक निरीक्षणा निमित्त
दौ-यावर
आहेत. दि. 21 एप्रिल
रोजी रोजी संध्याकाळी त्यांनी दारव्हा पोलीस स्टेशनला भेट दिली. शस्त्र दारुगोळा, मुद्देमाल निर्गती, गोपनिय रेकॉर्डची पाहणी केली.
व्यापारी संघाकडून सत्कार
मागील महीन्यात दारव्हा शहरात पडलेला दरोडा त्यानंतर पोलीसांनी ज्या तत्परतेने हालचाली करुन दरोडेखोरांना पकडले. गुन्हयातील सर्व मुद्देमाल हस्तगत केला. त्याबद्दल दारव्हा पोलीस व पर्यायाने महाराष्ट्र पोलीस दल कौतुकास पात्र आहे. गेल्या दोन वर्षात एकही जातीय घटना दारव्हा शहरात घडली नाही. गुन्हेगारीमध्ये घट झाली आहे अशी भावना व्यक्त करुन दारव्हा व्यापारी संघाने अतिरीक्त पोलीस महासंचालकांचा यथोचित सत्कार केला. तालुक्यातील बचत गटातर्फे त्यांनी स्वतःचे हाताने तयार केलेली भेटवस्तु सप्रेम भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, सहा. पोलीस अधिक्षक चिलुमुला रजनीकांत, दारव्हा, सहा. पोलीस अधिक्षक बी.जे. हर्षवर्धन, पुसद विभाग आदि हजर होत.
तुम्ही तुमच्या गावचे ठाणेदार
पोलीस पाटलांना संबोधित करतांना,
अप्पर पोलीस महासंचालक यांनी तुम्ही तुमच्या गावाचे ठाणेदार आहात. पोलीस
पाटलांनी कोण-कोणती कर्तव्य बजवावीत यावावत सखोल मार्गदर्शन केले. महीला दक्षता समिती, पोलीस पाटील, व्यापारी महासंघ
व सामान्य नागरीक यांच्या पोलीसांकडुन काय अपेक्षा आहेत. या भावना देखील जाणुन घेतल्या.
पोलिसांवर कौतुकाची थाप
पोलीस स्टेशनच्या आवारात रेखाटलेली सुंदर व भव्यदिव्य रांगोळी, दिलेली मानवंदना पोलीस स्टेशनचा निसर्गरम्य परीसर व पोलीस स्टेशनचे कामकाज
यामुळे अप्पर पोलीस महासंचालकांनी,
दारव्हा पोलीसांना कौतुकाची थाप दिली. पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी
यांनी अप्पर पोलीस महासंचालक यांना पोलीस स्टेशनचे कामकाजाची व परीसरासह तालुक्याची माहीती दिली.
0 Comments