महामानवांना अभिवादन करून समता पर्वाला सुरुवात : इंडियन आयडल फेम सवाई भट यांचा हिट्स ऑफ म्युझिक शो

यवतमाळ : समता पर्व प्रतिष्ठान द्वारा आयोजित समतापूर्व 2025 चे भव्य आयोजन दिनांक सात एप्रिल ते 13 एप्रिल या दरम्यान होणार असून या वैचारिक पर्वणी कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 7 एप्रिल 2025 ला सकाळी 7 वाजता यवतमाळ शहरातील महामानवांना अभिवादन करून करण्यात आली.

सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्या अर्पण करून त्यानंतर लोकमाता अहिल्याबाई होळकर, लोकसंत गाडगेबाबा, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ,राजश्री शाहू महाराज तसेच पाटीपुरा या ठिकाणी असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि माता रमाई तसेच महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मल्हार पण करून समता पर्वाची सुरुवात करण्यात आली.

समता पर्वाच्या मुख्य संयोजिका माधुरी वाळके, एड. सीमा तेलंगे, प्रमोदिनी रामटेके, पल्लवी कांबळे, एडवोकेट ज्योती जीवने, प्रिया वाकडे, वनमाला वंजारी, पल्लवी रामटेके, मराठा सेवा संघाची जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड,शोभाताई पारधी, हर्षा बोडके, देवांगना मेश्राम, सुनिता कापशीकर,स्नेहा डोंगरे, स्नेहल रेचे, विजय डोंगरे, सुरज खोब्रागडे, नारायण थूल,जनार्दन मनवर ,नंदकिशोर निमगडे, एड. रामदास राऊत, नितेश मेश्राम, प्रीतम थूल ,प्राध्यापक पंढरी पाटे, सचिन मनवर इत्यादींची उपस्थिती होती. 

आजचे कार्यक्रम

इंडियन आयडल फेम सवाई भट यांचा हिट्स ऑफ म्युझिक या कार्यक्रमाचे आयोजन 8 एप्रिल रोजी समता मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. सदर  कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. 

Post a Comment

0 Comments