
यवतमाळ :
सध्या आयपीएल सिजन १८ सुरु असून, आज चैनई सुपर किंग विरूध्द दिल्ली कॅपीटल
या किकेट मॅचवर सुरु असलेल्या सट्ट्यावर धाड टाकली. दोन आरोपींना अटक करुन किकेट मॅचवर सट्टा लावण्याचे उपयोगात येणारे साहीत्य व रोख आदि
मुद्दमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
साहील शेख मुबारक शेख वय ३० वर्ष रा. इंदीरा
नगर, यवतमाळ, अभिजीत रमाकांत तांबेकर वय
४९ वर्ष रा. देवराव पाटील शाळेजवळ, काळे लेआउट यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. दि.
५ एप्रिल रोजी गोकुल हेरिटेज, लोहारा येथे साहील शेख मुबारक शेख, व त्याचा मित्र अभिजीत तांबेकर हे लोहारा एमआयडीसी येथे अभिजीत यांचे नविनघरी आयपीएल सिजन १८ मधील आज रोजीच्या
चैनई सुपर किंग विरूध्द दिल्ली कॅपीटल या किकेट मॅचवर मोबाईल फोनद्वारे सट्टा घेवुन
पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगाराचा खेळ खेळवित आहे अशी माहिती स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी घरात प्रवेश
केला. सदर खोलीत दोन इसम खाली बसुन दोन पॅडवर मोबाईलवर बोलुन कागदावर
आकडे लिहतांना दिसुन आले. त्यांचेकडे सहा मोबाईल दिसले त्यावर
Online मॅचचे स्कोर सुरू दिसला व आवाज म्युट केला होता. त्यावर चैनई सुपर
किंग विरूध्द दिल्ली कॅपीटल यांचा सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होते. दिल्ली कॅपीटलची फलंदाजी सुरू असून, लगतच्या भितीला स्पीडकॉन कंपनीची रंगीत टिव्ही लागुन होती. त्यावर सुध्दा मॅचचे प्रक्षेपण सुरू होते. एका पॅडवर दि. ५ एप्रिल रोजी सीएसके आणि दिल्ली यांचे मॅचे मधील हिशोबाच्या पॅडवर भाव, अमाउंट,
नांव, असे हाताने लिहिलेले कागद लावलेले दिसून आले.
दि. ५ एप्रिल तसेच
सिएसके आणि दिल्ली असे लिहुन भाव, नांव, अमाउंट कॉलम प्रमाणे
नउ कॉलम पैकी ०७ कॉलम भरलेले/लिहलेले दिसत आहे. किकेट मॅचवर सट्टा लावण्याचे उपयोगात
येणारे साहीत्य व नगदी असा एकुण ७०,०२०/- रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला. पुढील कार्यवाही करण्यात करिता पोलीस
स्टेशन अवधुतवाडी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता,
अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू, सफौ सै. साजिद, सफौ बंडू डांगे, पोहवा रूपेश पाली, पोहवा योगेश डगवार, पोहवा प्रशांत हेडाउ, पोशि आकाश सुर्यवंशी, पोशि देवेंद्र होले, चापोहवा योगेश टेकाम यांनी केली.
1 Comments
Khoob chhan news
ReplyDelete