यवतमाळ : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतक-यांविषयी अपमानजनक वक्तव्य केले. कर्जमाफीच्या पैशाने शेतकरी साखरपूढे आणि लग्न समारंभ करतात. हे वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस साेमवारी (ता.७) निषेध करुन शेतक-यांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरले. तर यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. दरम्यान, महाराष्ट्र मध्ये hsrp हाय security registration plate च्या माध्यमातून चालू असलेली सामान्य जनतेची लूट थांबविण्यासाठी शासनाचा विरोधात निषेध आंदोलनही करण्यात आले.
शेतकरी हा देशाचा आणि राज्याचा कणा आहे. आपल्या श्रमावर संपूर्ण समाज उभा आहे. कर्जमाफी ही त्यांच्या कष्टाची आणि संकटातून दिलासा देणारी बाब असून त्यावर अशी शंका घेणे हे अत्यंत निंदणीय आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी आणि जिल्हा युवक काँग्रेस यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. या निवेदनामध्ये कृषीमंत्री काेकाटे यांच्यावर राज्य सरकारने शिस्तभंगाची कारवाई करावी, शेतक-यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी सरकारने ठोस भूमिका घ्यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या निषेधार्थ आंदोलनात आमदार बाळासाहेब मांगुळकर, प्रा. वसंतराव पुरके, रवि ढोक, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रा. डॉ. बबलू उर्फ अनिल देशमुख, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश भिसनकर, सुनील बोरकर, दत्ता हाडके, अशोक भूतडा, सचिन गुल्हाने, सिमा तेलंगे, साहेबराव खडसे, चंद्रकांत दोनाडकर, माजी नगरसेविका वैशाली सवाई, कैलास सुलभेवार, अमोल मेहर, वृषभ गुल्हाने, ज्ञानेश्वर गोहाडे, मारोती राजने, जरार खान, उत्तमराव खंदारे, ओम तिवारी, अभिषेक बगाडे, नईम पहेलवान, कृष्णा पुसनाके, मिलींद डेहरे, ॲड. धनंजय लाेखंडे आदींची उपस्थिती होती.
0 Comments