वैद्यकीय महाविद्यालयात ॲडमिशनच्या नावाखाली शिक्षकाची २४ लाखाने फसवणूक : मंत्रालयातील सचिवावर दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

यवतमाळ : बारावी पास झालेले विद्यार्थी, विद्यार्थीनीमध्ये डॉक्टर होण्याची क्रेश वाढली आहे. अनेक जण लाखो रुपये भरुन वैद्यकीय महाविद्यालयात लाखो, करोडो रुपये भरुन ॲडमशिन घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशाच प्रकारे मंत्रालयात सचिव असल्याची बतावणी करुन, मुलीची दत्ता मेघे वैद्यीय महाविद्यालयात ॲडमिशन मिळवून देतो अशी बतावणी करुन दिग्रस येथील एका शिक्षकाची २४ लाखाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी मंत्रालयातील सचिवावर गुन्हा दाखल केला आहे.

श्‍याम बाबाराव महाजन असे फिर्यादीचे नाव असून, ते वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय वसंतनगर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी शाश्वती हीची सन 2021-2022 मध्ये 12 वी झाल्याने व तीला मेडीकलला प्रवेश करायचा असल्याने NEET ची परिक्षा दिली होती. त्यामध्ये 320 मार्क मिळाले होते. दरम्यान दि.17 जानेवारी 2021 रोजी मंत्रालयातील सचिव प्रविण तानाजी राडे वय 36 वर्षे रा. अमनपुर ता. पलुस जि. सांगली ह.मु. न्यु पौर्णिमा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, ए-विंग, दुसरा माळा, पेडर रोड, आय. टी. कॉलोनी, कुम्बाला हील, मुंबई याच्या सोबत झाली होती. मी मंत्रालयात सचिव या पदावर असुन वैद्यकिय विभाग माझ्याकडे आहे. दरवर्षी माझ्याकडे दोन अँडमिशन असतात. ते माझ्यातर्फे करुन देत असतो. मी आतापर्यंत भरपुर विद्यार्थी लावले आहेत. त्याचे पॅकेज एक कोटी रुपये (1,00,00,000) आहे असे सांगीतले. त्यामध्ये तुमच्या मुलीचे पुर्ण साडेचार वर्षाचा खर्च असेल असे सुध्दा सांगीतले. यावेळी फिर्यादी श्‍याम महाजन यांनी माझ्या जवळ तेवढी रक्कम नसल्याचे सांगितले. यावेळी राडे यांनी पॅकेजमध्ये 75,00,000 रुपयात अँडमिशन होईल. सुरवातीचे दोन वर्षाची फी एकदाच भरावी लागेल. दोन वर्षानी बाकी राहीलेली फी भरावी लागेल. तुमच्या मुलीचे 75,00,000 रुपयात MBBS चे शिक्षण पुर्ण होईल असे सांगीतले. मला पैशाची जुळवाजुळव करण्या करीता लोन काढावे लागेल तसेच माझे घर विकावे लागेल असे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसानी राडे यांनी महाजन यांना पुन्हा फोन करुन कॉलेजच्या ट्रस्टी व चेअरमन सोबत बोलणे झाले आहे. तुम्हाला एकदाच फी भरणे शक्य नाही तर आपण फी चे हप्ते पाड्डु व सुरुवातीला 30,00,000. रुपये द्यावे लागतील आणि बाकी राहीलेले प्रवेश झाल्यानंतर द्यावे लागतील असे म्हणाला. तुमच्या मुलीचा नंबर दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे लागल्याचे सांगितले होते. महाजन यांनी आर.टी.जी.एस. द्वारे व नगदी असे एकुण 53,00,000 रुपये दिले आहे. त्यापैकी 28,75,000 रुपये मुलीचे कॉलेजच्या बँक खात्यात परस्पर अँडमिशन करीता भरले आहे. मात्र 24,25,000 रुपये बाकी आहे. सदर रक्कम देण्यास राडे हे टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शिक्षक  महाजन यांनी फसवणुक झाल्याची तक्रार दिग्रस पोलीस ठाण्यात दिली असून, दिग्रस पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.  

Post a Comment

0 Comments