यवतमाळ : पोलीस भरतीमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी पोलीस पाल्य यांची वयोमर्यादा 38 वर्ष करावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना यवतमाळ वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांना निवेदन पाठवण्यात आले.
पोलीस भरतीमध्ये पोलीस कर्मचारी यांचे पाल्य यांना पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्य आरक्षणतुन अर्ज करता येतात. पोलीस पाल्य यांचे वयाची मर्यादा 18ते 33 वर्ष आहे. पोलीस पाल्य वयाची मर्यादा 18ते 33 वर्ष दिली असली तरी पोलीस पाल्य यांचे मुलं एक तर 31 किंवा 33 वर्ष वयाचे असताना वडील सेवानिवृत्त होतात तेव्हा पोलीस पाल्य यांना पोलीस भरती देण्यासाठी एक किंवा दोन संधी मिळत आहे. कधी कधी पोलीस भरती झाली नाही तर वय संपून जात आहे.पोलीस भरती मध्ये पोलीस पाल्य वयाची मर्यादा 38 पर्यंत करण्यासाठी अनेक सेवानिवृत्त पोलीस पाल्य यांचे मत आहे.पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्य वयाची मर्यादा वाढविणयत यावे.या करिता निवेदन देण्यात आले. निवेदन देण्याकरिता महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख जिल्हा, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बोराडे , सचिव सोहेल काझी, सहसचिव संकेत अनविकर, महिला जिल्हाध्यक्षा स्नेहल ताई रेचे, जिल्हा सचिव मोनिका बळीराम शुक्ला, पोलीस बाॅईज शैलेंद्र नगराळे, मयूर जवादे, अॅलेकस अहीर, कश्यप कांबळे,अजय पावडे स्वप्नील सोनवणे, शाहिद शेख, अभिजित आत्राम, मयूर ढाकणे, कुणाल कैतवास, सुमीत पेंदोरे, जियुश उघडे,अदनय निबेकर, रोशन आमनेकर, विशाल जाधव, आशिष गेडाम, विनस अनविकर, पराग पत्रकार, रियाज शेख, शारिक शेख, विशाल येवले, दिप राजगडकर, सुरज वानखेडे, अभय जुमडे, नितीन नगराळे, प्रज्वल साबळे महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना पदाधिकारी व पोलीस बाॅईज यवतमाळ निवेदन देण्याकरिता उपस्थित होते.
0 Comments