ब्रेकींग : तीन मजुराचा मृत्यू; दोन जण जखमी : स्टोरेज अंगावर पडले


यवतमाळ : शहरालगत असलेल्या लोहारा एमआयडीसी परिसरात असलेल्या एका दालमिलमध्ये डाळ साठवणुकीचे स्टोअरेज पडल्याने तीन मजुराचा मृत्यू झाला. तर दोन मजुर जखमी झाले आहे. या घटनेतील एक मृतक मजुर हा वर्धा जिल्ह्यातील असून, दोन मजुर मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. ही घटना आज मंगळवारी १५ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

भावेश कडवे रा. वर्धा, मुकेश सुरेश काजले रा. खंडवा मध्यप्रदेश, सुरेश काजले रा. रामपूर खंडवा मध्यप्रदेश अशी मृतकांची नावे आहे. तर दिलीप रा. रामपूर खंडवा मझ्यप्रदेश, करण सिंग धुर्वे रा. रामपुर खंडवा मध्यप्रदेश अशी जखमींची नावे आहे. लोहारा एमआयडीसी परिसरात मनोरोमा जैन दाल मिल आहे. या ठिकाणी डाळ साठवणुकीचे स्टोरेज मजुरांच्या अंगावर पडले. यामध्ये तीन मजुरांचा मृत्यू झाला. तर दोन मजुर जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालात भरती करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. पुढील तपास लोहारा पोलीस करीत आहे.

 

Post a Comment

0 Comments