पहलगाम येथील गोळीबारानंतर यवतमाळातील नागरीकांमध्ये संताप : आतंकवादीच नव्हे तर त्यांचे आकाही शोधून गोळीने उडवा

यवतमाळ : आतंकवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो, त्यामुळे देशातील सद्भावना कायम ठेवत आतंकवाद्यांचा खात्मा करा. गोळीबार करणारे आतंकवादीच नव्हे तर त्यांच्या आकांचाही शोध घेऊन गोळया घाला असा संताप व्यक्त केला आहे. पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर यवतमाळात सुध्दा नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जम्मू काश्मीर येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे तेथील स्थानिक नागरीकांचे उत्पन्न सुध्दा वाढले होते. मात्र आतंकवाद्यांनी गोळीबार करुन एकीकडे निष्पाप नागरीकांचे बळी घेतले तर दुसरीकडे तेथील नागरीकांचा रोजगार सुध्दा हिसकावून घेतला आहे. आतंकवाद्यांच्या अशा कारवायांमुळे संपुर्ण देशात अस्थिरता निर्माण होत असल्यामुळे सरकारने याविरुध्द कठोर पाऊले उचलत आतंकवाद्यांना गोळया घातल्या पाहीजे असेही सिकंदर शहा यांनी  म्हटले आहे. इतक्या मोठया प्रमाणात नागरीकांची हत्या झाल्यानंतर पाकिस्तानने दिलगीरी किंवा खेद व्यक्त केला नाही. उलट भारताविरुध्द युध्दाची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता तरी भारताने पाकिस्तान विरुध्द आरपारची लढाई करुन त्यांना धडा शिकवावा अशी प्रतिक्रिया सुध्दा सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे. 

सद्भावना कायम ठेवा

काश्मीर मधील आतंकवाद्यांच्या मागे पाकीस्तानचा हात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे या देशाविरुध्द कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. आतंकवाद्यांचा कुठलाही धर्म नसतो, पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर तेथील मुस्लीम नागरीकांनी जखमींना मदत केली. आतंकवाद्यांचा विरोध केल्यामुळे एका मुस्लीम नागरीकाला सुध्दा आतंकवाद्यांनी ठार मारले. त्यामुळे देशातील सद्भावना कायम राहणे सुध्दा गरजेचे असल्याचे सिकंदर शहा यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments