यवतमाळ : दोन कारची धडक होवून झालेलेया अपघातात राज्य सफाई कामगार आयोगाचे माजी अध्यक्ष जखमी झाले. ही घटना दिग्रस आर्णी मार्गावरील सावंगा बु. या गावाजवळ ९ एप्रिल
दुपारी ५ वाजताच्या दरम्यान घडली. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त
तथा राज्य सफाई कामगार आयोगाचे माजी अध्यक्ष रामुजी पवार हे आपल्या चारचाकी वाहन क्रमांक
एम एच २९ सी जे १२६० ने नागपूर येथे लग्न समारंभासाठी आर्णी मार्गे जात होते.
आर्णीवरून दिग्रसकडे येणाऱ्या एम एच २९ ए डि २८३७ क्रमांकाची
कार व पवार यांच्या कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये रामुजी पवार हे
जखमी झाले आहे. त्यांना उपचारा करीता दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी
खाजगी रुग्णालात हलविण्यात आले. या घटनेने दोनही
कारचे नुकसान झाले आहे. या घटनेचे तक्रार दिग्रस पोलिसात दिली
असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात
सुरु आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments