यवतमाळ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची जयंती सुरु असतांना न्यायालय परिसरात देशी कट्टा घेवून फिरणा-या आरोपीला अटक
करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी कट्टा व दोन काडतूस जप्त करण्यात आले. ही
कारवाई पुसद येथील डिवायएसपी यांच्या पथकाने पुसद शहरात करण्यात आली.
शेख सलीम शेख इस्माईल रा. तुकाराम बापू वार्ड पुसद असे आरोपीचे
नाव आहे. पुसद शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक सुरू असताना न्यायालय
परिसरात एक युवक देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती
पुसद येथील एएसपी हर्षवर्धन बी जे यांना मिळाली होती.
त्यावरुन आरसीपी पथकास पाचारण करण्यात आले. पथकाने आरोपी शेख
सलीम याची अंगझडती घेतली असता यामध्ये त्याच्या
जवळून एक देशी कट्टा व दोन काडतूस आढळून आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत शस्त्र कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात
आला. पुढील तपास पुसद पोलिस करीत आहे.
0 Comments