राहुल वासनिक / तहलका टाईम
यवतमाळ : दालमिलमध्ये डाळ
साठवणुकीचे स्टोरेज पडल्याने तीन मजुराचा मृत्यू तर दोन मजुर जखमी झाल्याची
घटना लोहारा एमआयडीसी परिसरात काल मंगळवारी घडली होती. ही भयानक
घटना सिसिटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमध्ये
नेमकी चुक कोणाची, या घटनेला नेमके जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान
आज बुधवारी इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर,
कामगार विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. या दालमिलमध्ये काम करणा-या
कामगारांचे बयानही नोंदविण्यात आले. यामध्ये काय निषपन्न होते याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे.
वाघापूर येथील रहिवासी असलेल्या जैन यांच्या
मालकीचे लोहारा एमआयडीसी परिसरात मनोरोमा जैन दालमिल आहे. सदर दालमिलमध्ये भावेश कडवे रा. वर्धा, मुकेश
सुरेश काजले रा. खंडवा मध्यप्रदेश, सुरेश
काजले रा. रामपूर खंडवा मध्यप्रदेश, दिलीप
रा. रामपूर खंडवा मध्यप्रदेश, करण सिंग धुर्वे रा. रामपुर खंडवा मध्यप्रदेश व
अन्य कामगार कार्यरत होते. १५ एप्रिल रोजी काम डाळीचे पोते भरणे सुरु असतांना
अचानक स्टोरेज खाली पडली. या दुर्घटनेत भावेश कडवे रा. वर्धा, मुकेश सुरेश काजले रा. खंडवा
मध्यप्रदेश, सुरेश काजले रा. रामपूर
खंडवा मध्यप्रदेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलीप रा.
रामपूर खंडवा मझ्यप्रदेश, करण सिंग धुर्वे रा.
रामपुर खंडवा मध्यप्रदेश हे दोघे जखमी झाले होते. याप्रकरणी
लोहारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान आज बुधवारी १६ एप्रिल
रोजी इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर अमर भोगे यांनी
घटनास्थळी येथे भेट देवून पाहणी केली. त्या ठिकाणी असलेल्या अन्य कामगारांचे बयाण
नोंदविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी ‘तहलका टाईम’ला दिली. तसेच कामगार विभागाच्या
अधिका-यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. कामगार विभागाच्या अधिका-यांनीही
भेट दिली. या घटनेला नेमके दोषी कोण, या संदर्भात काय कारवाई होईल याकडे सर्वांचे
लक्ष लागले आहे. या घटनेसंदर्भात प्रतिक्रीया घेण्यासाठी कामगार अधिकारी राहुल
काळे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला मात्र संपर्क होवू शकला नाही.
चौकशी सुरु : अमर भोगे
लोहारा एमआडीसी परिसरातील दालमिलमध्ये स्टोरेंज पडल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर अमर भोगे यांनी आज घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. दालमिल संदर्भातील कागदपत्राची तपासणी केली आहे. तसेच तेथे कार्यरत असलेल्या कामगारांची माहिती घेतली आहे. या दालमिलमध्ये २० पेक्षा कमी कामगार असल्याने फॅक्ट्री ॲक्टमध्ये येत नाही. या प्रकरणाची चौकशी सुरु असून, त्यानंतर कारवाई करु अशी प्रतिक्रीया इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर अमर भोगे यांनी ‘तहलका टाईम’ला दिली.
0 Comments