बिंग ब्रेकींग : अखेर 'त्या' वाघीणीचा मृत्यु

यवतमाळ : जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रातील भेंडाळा नियतक्षेत्र कक्ष क्र. 20 बी सावळी रोपवनामध्ये वाघीणीला अर्धांगवायु झाला होता. हा प्रकार समोर येताच अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जलद बचाव पथक पाचारण करण्यात आले होते. वाघीणीवर उपचार करुन पुढील उपचारासाठी गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्र, नागपुर येथे पाठविण्यात आले होते. मात्र त्या ठिणाकी सदर वाघीणीचा मृत्यु झाला आहे.

मुकुटबन वनपरिक्षेत्रातील भेंडाळा नियतक्षेत्र कक्ष क्र. 20 बी सावळी रोपवनामध्ये वाघीण आढळून आली होती. त्यामुळे सदर वाघीण रेस्क्यु करुन उपचार करण्याकरीता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जलद बचाव पथकास मोकास्थळी पाचारण करण्यात आले. सदर चमुचे प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकिय अधिकारी यांनी वाघीणीला बेशुध्द करण्याकरीता डार्ट तयार केला. तो डार्ट अजय मराठे (निशानेबाज) यांनी सदर वाघीणीच्या डाव्या खांद्यावर अचुक निशाना साधुन सायंकाळी 8.29 वा. डार्ट मारला. वाघीण अशक्त

सदर वाघीण बेशुध्द झाल्यानंतर सदर वाघीणीची तपासणी केली. सदर वाघीणीला अर्धांगवायू झाला असल्याचा पशुवैद्यकिय अधिकारी यांनी अंदाज वर्तविला होता. सदर वाघीणीस पुढील उपचारा करीता गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्र, नागपुर येथे स्थलांतरीत करण्यात आले. मात्र सदर वाघीणीचा मृत्यु झाला. या घटनेला धनंजय वायभासे उपवनसंरक्षक यांनी दुजोरा दिला.

Post a Comment

0 Comments