समता पर्वातून होणार वैचारिक व सांस्कृतिक मेजवानी दि. ७ ते १३ एप्रिल रोजी समतापर्वचे आयोजन



यवतमाळ : क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ यवतमाळ तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांनी समतापर्व या वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली.या वैचारिक चळवळीचे सातत्य ठेवत यवतमाळकरांनी याही यावर्षी समतापर्वचे भव्य आयोजन केले आहे.यावर्षी आयोजनामध्ये महिलांनी पुढाकार घेतला हे विशेष म्हणून सांगता येईल. दिनांक 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2025 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यवतमाळ शहरातील महामानवाच्या पुतळ्यांना व प्रतिमांना हार करून समता पर्वाची सुरुवात होईल.दिनांक 7 एप्रिल ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती ‘संगम शरणम गच्छामि’महानायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महानाट्य सादर होणार आहे.याच दिवशी दुपारच्या सत्रामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीमध्ये कलात्मक पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल सायंकाळी ६ वाजता इंडियन आयडल फेम हिट्स ऑफ मॅजिक शो सवाई भट राजस्थान यांचा गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.सोबतच मुंबई येथील प्रसिद्ध कलावंतांचा आर्केस्ट्रा असणार असून दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी महिलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले असून यावेळी मैत्री ग्रुप यांच्या वतीने पारंपारिक वेशभूषा व नृत्य स्पर्धा संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे पुणे येथील प्रसिद्ध पत्रकार मुक्ता कदम या प्रबोधनात्मक दृष्टिकोनातून माध्यमानवर मार्गदर्शन करणार आहे. दिनांक 10 एप्रिल रोजी समतापर्व चे उद्घाटन संपन्न होणार असून समता मैदानामध्ये असणाऱ्या विविध प्रदर्शनीचे उद्घाटन सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे. सोबतच यवतमाळ येथील बालकलाकार संग्राम सीमा धनंजय लोखंडे या कलावंतांची शिवगर्जना व भीमगर्जना सादर होणार आहे.संध्याकाळी सात वाजता उद्घाटकीय समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून भारतातील ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांची उपस्थिती राहणार आहे.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ हर्षदीप कांबळे प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग मुंबई, नरेंद्र फुललेले अतिरिक्त जिल्हाधिकारी वर्धा, नंदकुमार रामटेके उपनिबंधक नागपूर तसेच यवतमाळ येथील सुपुत्र मनीष नारनवरे आयएएस,अनिल खडसे आय आर एस यांची उपस्थिती प्रामुख्याने राहणार आहे. तसेच ज्येष्ठ विचारवंत कसबे यांचा एक क्षण गौरवाचा हा कार्यक्रम संपन्न होणार असून त्यांना यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतारत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यासोबत यवतमाळ येथील जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांना समता सेवा समर्पण पुरस्कार तर दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी चेतन देशमुख यांना सत्यशोधक पुरस्कार बहाल केल्या जाणार आहे याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बली खैरे यांच्या ऐतिहासिक चित्राला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा जाहीर गौरव केल्या जाणार आहे.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ.लीला भेले,माधुरी वाळके,एड. सीमा तेलंग,प्रमोदिनी रामटेके यांची उपस्थिती राहणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2025 ला सकाळी ८ वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून सायंकाळी सहा वाजता सत्यशोधक क्रांती गीते स्नेहल मदनकर, दीपक वाघ सादर करणार आहेत.सोबतच अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ रिधोरा येथील कलावंत नामदेव वाढाई व त्यांचा संच यांचे सादरीकरण होणार आहे. सोबतच ६ वाजता मी सावित्री बोलते निर्मला जीवने यांचा एक पत्री प्रयोग संपन्न होईल,यासोबत ७ वाजता भारतातील प्रसिद्ध वक्ते प्रोफेसर डॉ. लक्ष्मण यादव दिल्ली यांचे 21 वी सदी तथा भारतीय संविधान और सत्यशोधक आंदोलन या विषयावर जाहीर व्याख्यान होणार असून यावेळी एड.फिरदोस मिर्झा यांचा सत्कार संपन्न होईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष एड.आशिष देशमुख राहणार आहे .दिनांक 12 एप्रिल 2025 ला देशातील प्रसिद्ध तत्त्वज्ञ डॉ.शरद बाविस्कर जेएनयू दिल्ली यांचे व्याख्यान होणार असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बदलत्या भूमिका व युवकांसमोरील प्रश्न या विषयावर त्यांचे मार्गदर्शन होणार असून त्यांना यावर्षीचा समता भूषण पुरस्कार बहाल केल्या जाणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत सरदार तसेच सोबतच दिल्ली विश्वविद्यालयाचे प्रोफेसर रतनलाल हे जाहीर व्याख्यान देणार असून नव्या राजकीय व्यवस्थेत एससी एसटी ओबीसी चे भविष्य यावर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातील पहिल्या महिला अनुसूचित जातीच्या पहिल्या आयएएस अनिता मेश्राम मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र फिशरी डेव्हलपमेंट कार्पोरेशन मुंबई यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असून यवतमाळ येथील प्रसिद्ध पत्रकार पद्माकर घायवान यांना म बा मेश्राम पत्रकारिता पुरस्कार बहाल केल्या जाणार आहे.

13 एप्रिल 2025 ला यवतमाळ आयडलची अंतिम फेरी संपन्न होणार असून यावेळी समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण प्रसिद्ध पत्रकार संजय आवटे यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माधुरी वाळके असून प्रमुख अतिथी माधव सरकुंडे हे आहेत यावेळी राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार संजय आवटे यांना प्रधान केल्या जाणार असून केशव सावळकर यांना ‘समता शोध वार्ता पुरस्कार ‘बहाल केल्या जाणार आहे या कार्यक्रमाला यवतमाळ येथील माननीय नामदार अशोक उईके,माननीय नामदार इंद्रली नाईक ,माजी मंत्री छगन भुजबळ ,आमदार संजय दरेकर सह यवतमाळ येथील सर्व राजकीय क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती हजर राहणार आहेत.यावेळी सर्व स्पर्धांच्या व पारितोषिकाचे वितरण समता मैदान या ठिकाणी होणार आहे उपस्थिती सांगा ना कोण आहेत या पत्रकार परिषदेला माधुरी वाळके ,एड. सीमा तेलंग ,प्रमोदिनी रामटेके, प्रिया वाकडे ,पल्लवी रामटेके ,हर्ष बोडके ,सुनीता कापशीकर, स्नेहल रेचे ,विना गोतमारे ,शोभा पारधी ,प्रतिमा दातार,वनमाला वंजारी ,स्नेहा डोंगरे ,एडवोकेट वैशाली हिरे,स्वाती दरणे ,सोबतच अनिल आडे, एडवोकेट रामदास राऊत ,इंजिनियर मनोहर शहारे ,एडवोकेट जयसिंग चव्हाण ,ज्ञानेश्वर गायकवाड ,हेमंत कांबळे ,जितेंद्र ढानके,जनार्दन मनवर,प्राचार्य अरुण शेंडे ,एडवोकेट धनंजय लोखंडे ,नारायण थुल ,नितेश मेश्राम ,डॉ.चंद्रकांत सरदार ,सचिन मनवर,प्रा.पंढरी पाटे ,नंदकिशोर निमगडे ,चंद्रकांत वाळके, शुभम वाळके दत्तू पारधी ,सुरज खोब्रागडे ,एडवोकेट ज्योती जीवने अंकुश वाकड़े यांची उपस्थिति होती.

Post a Comment

0 Comments