यवतमाळ : युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा
आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेचा अंतीम निकाल आज
जाहीर झाला. यामध्ये यवतमाळच्या दोघांनी बाजी मारली आहे.
यवतमाळ शहरातील अबिदा अमद अशफाक अहमद हिने देशातून १४२ क्रमांक पटकावला आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी हे यश मिळवत आहे.
अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी होणार आहे. तर जिल्हा परिषद शाळा लासीना येथे कार्यरत शिक्षकांचा शंकर
आडे यांचा मुलगा डॉ. जयकुमार आडे याने ३०० वा क्रमांक पटकविला आहे. या दोघांनीही
यवतमाळचे नाव राज्यासह देशात नावलौकीक मिळविले आहे.
यवतमाळ
शहरातील कळंब चौक कुरेशीपुरा येथील अदिबा अमद ही हज हाऊस IAS ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जामिया रेसिडेन्शियल ट्रेनिंग
इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी होती. यापूर्वी आदिबाने यूपीएससीची
मुलाखत दिली होती, परंतु अंतिम निवड
झाली नव्हती. पण या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झाली आहे. तिला IAS पोस्ट मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला
मुस्लिम IAS बनली आहे.
डॉ. जयकुमार आडे यांनी तिस-या प्रयत्नात मारली बाजी
यवतमाळ
पंचायत समिती अंतर्गत येणा-या लासीना जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक शेकर
आडे यांचा मुलगा डॉ. जयकुमार आडे यानी तीस-या प्रयत्ना युपीएससी सर केली आहे.
त्याची रॅक ३०० आहे. डॉ. जयकुमार आडे याचे प्राथमिक शिक्षक आरकेएस पब्लिक स्कुल तर
दहावी पर्यंतचे शिक्षण वायपीएस मध्ये झाले, अकरावी व बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण
अकोला येथील आरएलटी कॉलेज मध्ये घेतले. सध्या तो आकोला येथे शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून एम. डी करीत आहे. एमबीबीएस झाल्यावर नेर तालुयातील बोरगाव
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली आहे. तिस-या
प्रयत्नात त्याने युपीएससीची परिक्षा सर केली आहे.
0 Comments