प्रवीण चंपत नैताम वय 40 वर्ष रा. उमरी स्मारक असे मृतकाचे नाव आहे. तर रुपेश संतोष झाडे वय 40 वर्ष रा. उमरी स्मारक ह. मु. धामणगाव रेल्वे जि. अमरावती असे आरोपीचे नाव आहे. मृतक प्रवीण नैताम हा विवाहीत असून, पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासोबत राहत होता. तो ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. गेल्या तीन वर्षापासून त्याचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक सबंध होते. महिलेचे भासरे आरोपी रुपेश झाडे याला याबाबतची माहिती गेल्या दोन वर्षापासून होती. त्यावेळी त्या दोघात वाद झाला होता. दरम्यान आज शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता प्रवीण नैताम हा घरुन जेवणाचा डब्बा घेवून बाभुळगाव येथे कामावर गेला होता. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास आरोपी रुपेश याने सबलीने प्रवीणवर हल्ला चढविला. या भांडणाची माहिती गावात पसरताच गावातील लोकांसह प्रवीणची पत्नी सिमा ही त्या ठिकाणी गेली. यावेळी आपल्या पतीला मारहाण करीत असल्याचे निदर्शनास येताच ती पतीला वाचविण्यासाठी जात होती. यावेळी आरोपीने तु आता प्रवीणची लाश घ्यायला येजो असे म्हणून आत येण्यास मज्जाव केला. त्यामुळे सिमा नैताम ही बाभुळगाव पोलीस ठाण्यात माहिती देण्यासाठी जात होती. अशातच प्रवीणचा मृत्यू झाल्याची माहिती ननंद कवीता मडावी हिने सिमाला दिली. या घटनेची माहिती मिळताच बाभुळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी मृतकाची पत्नी सिमा नैताम यांच्या तक्रारीवरुन बाभुळगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.
The Menu of this blog is loading..........
0 Comments