यवतमाळ : समतापर्व प्रतिष्ठान द्वारा आयोजित समतापर्व 2025 चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये काल हिट्स ऑफ म्युझिक शो राजस्थानचे प्रसिद्ध गायक इंडियन आयडल फ्रेम सवाई भट यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतिक्रिया व्यक्त करत असताना ,महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ ही लोक चळवळ झाली असून ही चळवळ जर आमच्या राजस्थानमध्ये झाली असती तर आमची प्रगती गगनाला टेकली असती. मी भटक्या विमुक्त या जमातीमध्ये असताना मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाचा मार्ग गवसल्याने आज मी संपूर्ण भारतामध्ये एक हर हुन्नरी कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानावे तेवढे कमी आहे.
यावेळी या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रज्ञा नरेंद्र फुलझेले ,आयकर अधिकारी अमरावती ,तर अध्यक्ष म्हणून धनंजय वायभासे भारतीय वन सेवा उपवनसंरक्षक यवतमाळ तसेच मंगला मून, उत्तम फळ ,स्वप्निल भोवते, संतोष चव्हाण,निलेश सोनवणे ,प्रणिता पारधी ,डॉ.अनिल उंबरे ,डॉ. विजय मून, जया राऊत ,डॉ. अरुण जनबंधू ,महेश सोनेकर ,संजय बिहाडे ,ओम प्रकाश नगराले ,अभि. मनोहर शहारे, माधुरी वाळके ,एड. सीमा तेलंगे, प्रमोदिनी रामटेके यांची उपस्थिती होती.
संविधान सन्मान रॅली
काल यवतमाळ शहरातील असणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी संविधानाच्या सन्मानार्थ भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची लेझीम पथके, तसेच ढेमसा नृत्य आदिवासी नृत्य व महापुरुषांचे पोशाख परिधान करून या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे गुरुदेव सेवा मंडळाचे असणाऱ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रनिर्मितीचा विचार घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे असा संदेश दिला. याच वेळी यवतमाळ येथील संगीतकार सुबोध वाळके यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. या कार्यक्रमाची संचालन प्रतिभा वाढोरे व प्रिया वाकडे यांनी केले.
0 Comments